Home /News /entertainment /

शाहरुख खानसोबतच्या मतभेदावर अजय देवगणने सोडलं मौन, म्हणाला 'आमचा एकमेकांवर....

शाहरुख खानसोबतच्या मतभेदावर अजय देवगणने सोडलं मौन, म्हणाला 'आमचा एकमेकांवर....

बॉलिवूडमध्ये (Bollywood) काही कलाकार असे आहेत जे 90पासून प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. अजय देवगण (Ajay Devgn) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) हेसुद्धा असेच बॉलिवूड स्टार आहेत. जे 90 च्या दशकापासून पडद्यावर लोकांचे मनोरंजन करत आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 6 मे- बॉलिवूडमध्ये   (Bollywood)  काही कलाकार असे आहेत जे 90पासून प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. अजय देवगण  (Ajay Devgn) आणि शाहरुख खान   (Shahrukh Khan)  हेसुद्धा असेच बॉलिवूड स्टार आहेत. जे 90 च्या दशकापासून पडद्यावर लोकांचे मनोरंजन करत आहेत. शाहरुख खानने काजोलसोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. शाहरुख आणि अजयने एकाच वर्षी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. एकीकडे किंग खानने 1992 मध्ये 'दीवाना' चित्रपटातून तर दुसिकडे अजयने 1991 मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्याही सतत येत असतात. ज्यावर अजय देवगनने आता मौन सोडले आहे. अजयने शाहरुख आणि आपल्या नात्यावर उघड प्रतिक्रिया दिली आहे. अजय देवगन हा अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याला आपल्या खाजगी गोष्टी माध्यमांसमोर आणायला आवडत नाही. तो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अगदी मोजूनमापून देत असतो. परंतु अलीकडेच त्याने शाहरुख खानसोबतच्या मतभेदाच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देत सत्य सर्वांसमोर आणलं आहे. त्यामुळे अनेक वर्षांच्या या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. नुकतंच इंडिया टुडेशी संवाद साधताना अजय देवगण म्हणाला, 'आम्ही 90 च्या दशकातील 6-7 कलाकार आहोत. आम्ही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही नेहमीच एकमेकांना साथ दिली आहे. मीडिया आमच्याबद्दल काहीही लिहिते, माझ्या आणि शाहरुख खानबद्दल तसं काहीच नाहीय. आम्ही फोनवर बोलतो. आमचं नातं खूप मजबूत आहे. जेव्हा एकाला अडचण येते तेव्हा दुसरा पाठीशी उभा असतो. आमचा एकमेकांवर विश्वास आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे कोणी म्हटले तर तो खरोखरच सोबत राहतो'.अजयच्या या खुलास्यानंतर अनेक वर्षांपासून चालत आलेल्या या चर्चेला अखेर पूर्णविराम लागला आहे. अजय देवगण आणि शाहरुख खान यांनी आजपर्यंत एकाही चित्रपटात एकत्र केलेलं नाही. मात्र अलीकडेच दोघे एका जाहिरातीत एकत्र दिसले होते. ज्यामध्ये दोघांना एकत्र पाहून त्यांचे चाहते खूप आनंदी झाले होते. त्याचबरोबर शाहरुखची काजोलसोबत चांगली मैत्री आहे.दोघांचं फारच स्पेशल बॉन्डिंग आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Ajay devgan, Bollywood News, Entertainment, Shahrukh khan

    पुढील बातम्या