मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

यशराजच्या 180 कोटींच्या ऑफरला अजय देवगनचा नकार, हे आहे कारण

यशराजच्या 180 कोटींच्या ऑफरला अजय देवगनचा नकार, हे आहे कारण

अजय सध्या अनेक प्रकल्पात काम करत आहे. अजय पहिल्यांदाच यशराज बॅनरच्या (yasharaj films) ‘सुपरहिरो’ (superhero) चित्रपटात झळकणार होता.

अजय सध्या अनेक प्रकल्पात काम करत आहे. अजय पहिल्यांदाच यशराज बॅनरच्या (yasharaj films) ‘सुपरहिरो’ (superhero) चित्रपटात झळकणार होता.

अजय सध्या अनेक प्रकल्पात काम करत आहे. अजय पहिल्यांदाच यशराज बॅनरच्या (yasharaj films) ‘सुपरहिरो’ (superhero) चित्रपटात झळकणार होता.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 24 एप्रिल : बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता (bollywood actor) म्हणून अजय देवगनला (ajay devgn) ओळखलं जात. अजयने चाहत्यांच्या मनात आपलं एक विशिष्ट स्थान बनवलं आहे. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहात असतात. अजय सध्या अनेक प्रकल्पात काम करत आहे. अजय पहिल्यांदाच यशराज बॅनरच्या (yasharaj films) ‘सुपरहिरो’ (superhero) चित्रपटात झळकणार होता. मात्र त्याने या चित्रपटाला नकार दिल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. अजयचं मानधन मिळून या चित्रपटाचं बजेट 180 कोटींच्या पुढे होतं. यात अजय सुपरविलनच्या भूमिकेत दिसणार होता.

शिव रवैल यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार होतं आहे. यशराज बॅनरला या चित्रपटासाठी अजय देवगनच्या बऱ्याच तारखा पाहिजे होत्या. मात्र अनेक प्रकल्पात बिझी असल्यामुळे अजयला ते शक्य नव्हतं. दुसरीकडे यशराज बॅनरसुद्धा शुटींग पुढे ढकलण्याच्या मनस्थित नव्हते. त्यामुळे एकंदरीतचं निर्णय घेत या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

बॉलीवूड हंगामाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय देवगनने हा चित्रपट अजून साईनं केलेला नव्हता. कारण तारखांच्या अडचणीमुळे अजयने या चित्रपटाला नकार दिला आहे. मात्र या चित्रपटात अजयची अतिशय दमदार भूमिका होती. खूप दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला हा चित्रपट आदित्य आता पुढे घेऊन जात आहेत.

(वाचा - वजन कमी करण्यासाठी नेहा कक्करची धडपड; काय काय करतेय पाहा हा VIDEO )

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाला या वर्षाच्या अखेरपर्यंत होल्डवर ठेवण्यात आलं आहे. तोपर्यंत अजयला वेळ मिळाला तर तो या चित्रपटाचा भाग होऊ शकतो.

(वाचा - 'थोडी तरी लाज बाळगा' मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेणाऱ्यांवर भडकला नवाझुद्दिन  )

अजय आगामी काळात अनेक चित्रपटांत दिसून येणार आहे. अजय फक्त हिंदीचं नव्हे, तर दाक्षिणात्य चित्रपटसुद्धा दिसणार आहे. एस.एस.राजमौली यांच्या आर.आर.आर. या चित्रपटातील अजयच्या लुकची मोठी चर्चा होतं आहे. तसंच अजय मैदान, गंगूबाई काठियावाड, मेडे, थँक गॉड यांसारख्या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्याचबरोबर नीरज पांडे यांच्या चाणक्यवर आधारित एका चित्रपटात सुद्धा अजय दिसणार आहे. इतकचं नव्हे तर तो स्वतः च्या निर्मिती संस्थेमध्ये सुद्धा काही चित्रपटांची निर्मिती करण्याच्या विचारात आहे.

First published:

Tags: Ajay devgan, Bollywood, Marathi entertainment