मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'BoyCottRadhikaApte' ट्रेंड होताच; मदतीसाठी पुढे सरसावला सहकलाकार

'BoyCottRadhikaApte' ट्रेंड होताच; मदतीसाठी पुढे सरसावला सहकलाकार

राधिकाला साथ देण्यासाठी ‘पार्च्ड’मधील सहकलाकार आदिल हुसैन (Adil Husain) पुढे सरसावला आहे.

राधिकाला साथ देण्यासाठी ‘पार्च्ड’मधील सहकलाकार आदिल हुसैन (Adil Husain) पुढे सरसावला आहे.

राधिकाला साथ देण्यासाठी ‘पार्च्ड’मधील सहकलाकार आदिल हुसैन (Adil Husain) पुढे सरसावला आहे.

  मुंबई, 18 ऑगस्ट-  मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे(Radhika Apte) सध्या नेटीझन्सच्या निशाण्यावर आहे.‘पार्च्ड’(Parched) या राधिकाच्या एका जुन्या चित्रपटाच्या न्यूड सीनवरून(Nude Scene) तिला ट्रोल केलं जात आहे. या चित्रपटातील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राधिकाला बॉयकॉट(Boycott Radhika Apte) करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. गेली चार दिवस ‘बॉयकॉट राधिका आपटे’ हा ट्रेंड ट्वीटरवर सुरु आहे. या कठीणप्रसंगी साथ देण्यासाठी ‘पार्च्ड’मधील सहकलाकार आदिल हुसैन (Adil Husain) पुढे सरसावला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Adil Hussain (@_adilhussain)

  हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अभिनेता आदिल हुसैनने, ‘राधिका आपटेने हे सीन केल्यामुळे भारतीय संस्कृती खराब झाली. या नेटीझन्सच्या आरोपावरून राधिकाला बॉयकॉट करण्याच्या मागणीला आदिलने हास्यास्पद म्हटलं आहे’. या मुलाखतीदरम्यान त्यांनी म्हटलं, ‘या सर्वांबद्दल मला तेव्हा कळालं, जेव्हा मी माझी गुगल नोटिफिकेशन पाहिली. मला वाटतं त्या सीनवरून राधिकाला ट्रोल करणं किंवा त्या सीनला इतकं मोठं प्रकरण बनवणं मला हास्यास्पद वाटतं. मी अशा गोष्टींकडे अजिबात लक्ष नाही देत. आणि या गोष्टींवर एकमेव उत्तर म्हणजे कोणतंच उत्तर देऊ नये’. (हे वाचा:ए.आर.रहमानने 'Covid Relief Fund'साठी कलाकारांच्या मदतीनं जमवला कोटींचा निधी  ) त्यांनी पुढं म्हटलं, ‘जे लोक राधिकाला ट्रोल करत आहेत, त्यांना कला आणि पोर्नमधील फरक माहिती नाहीय. कलेवर आजही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या लोकांनी आयुष्याच्या किंवा कलेच्या शाळेत अवश्य जावं’. (हे वाचा:सिद्धार्थने शेयर केलं कॅप्टन विक्रम बत्रांनी लिहिलेलं पत्र; वाचून तुम्हीही व्हाल  ) ‘पार्च्ड’ हा चित्रपट लीना यादव यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट गुजरातच्या एका गावातील चार महिलांवर आधारित आहे. या चित्रपटात बालविवाह, हुंडा, लग्नानंतर बलात्कार अशा वाईट प्रथा चालीरूढीवर आधारित आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News

  पुढील बातम्या