Home /News /entertainment /

अभिषेकने विकलं आपलं लग्जरी घर; तब्बल इतक्या कोटींमध्ये केलं होतं खरेदी

अभिषेकने विकलं आपलं लग्जरी घर; तब्बल इतक्या कोटींमध्ये केलं होतं खरेदी

अभिषेक बच्चनने विकलेलं घर हे ओबेरॉय 360 वेस्ट टॉवरच्या 37व्या मजल्यावर आहे. हे घर 7527 स्क्वेयर फुटाचं आहे.

  मुंबई, 13 ऑगस्ट-  बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachhan)नेहमी आपल्या चित्रपटांबद्दल चर्चेत असतो. मात्र यावेळी अभिषेक एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. आणि हे कारण म्हणजे अभिषेकचं लग्जरी घर होय. अभिषेकने नुकताच आपलं लग्जरी घर विकलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिषेकने तब्बल 41 कोटी रुपयांना हे घर खरेदी केलं होतं. मात्र सध्या अभिषेकने हे घर विकल्याचं सांगण्यात येत आहे.
  अभिषेक बच्चनने विकलेलं घर हे ओबेरॉय 360 वेस्ट टॉवरच्या 37व्या मजल्यावर आहे. हे घर 7527 स्क्वेयर फुटाचं आहे. अभिषेक बच्चनने 2014 मध्ये हे घर 41कोटीला खरेदी केलं होतं. आणि आत्ता हेच घर त्याने तब्बल 45.75 कोटींमध्ये विकल्याचं म्हटलं जातं आहे. हे घर खूपच लग्जरी होतं. तसेच या बिल्डिंगमध्ये बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार आणि शाहिद कपूर यांचसुद्धा घर आहे. शाहिदने 56 कोटी तर अक्षयने 52.5 कोटींमध्ये आपलं हे घर खरेदी केलं आहे. जर अभिषेक या ठिकाणी राहायला आला असता, तर अक्षय आणि शाहिद त्याचे शेजारी असते. (हे वाचा: दोन्ही मुलांच्या नावावरून ट्रोल झालीय करीना; असा करते ट्रोलर्सचा सामना) अभिषेक, अक्षय आणि शाहिदप्रमाणे अनेक कलाकरांनी या अपार्टमेंटमध्ये आपलं घर घेतलं आहे. तसेच अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या अंधेरी भागात एक घर खरेदी केलं आहे. त्याची किंमत 31 कोटी इतकी आहे. zapkey.com च्या मते ही डील 2020मध्ये झाली होती. तसेच अभिषेक बच्चन सध्या पत्नी ऐश्वर्या, मुलगी आराध्या आणि आईवडील अमिताभ बच्चन-जया बच्चनसोबत मुंबईच्या जुहूमध्ये असणाऱ्या ‘जलसा’मध्ये राहतो. जलसाचं नेहमीचं सर्वांना आकर्षण राहिलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Abhishek Bachchan, Bollywood actor

  पुढील बातम्या