मुंबई, 25 नोव्हेंबर: अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. गेल्या काही दिवसांपासून इरा डिप्रेशनबद्दल, स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल इन्स्टाग्राम व्हिडीओंची सीरिज बनवत आहे. तिच्या व्हिडीओंना चाहत्यांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण इरा खान (Ira Khan) आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मिशाल कृपलानीसोबत इरा रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण काही महिन्यांपूर्वीच तिचं आणि मिशालचं ब्रेक अप झालं होतं.
कृपलानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता इराच्या आणि नुपूर शिखारेच्या (Nupur Shikhare) प्रेमसंबंधांच्या चर्चांना उधाण आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात हे दोघं एकमेंकांच्या जवळ आले अशी माहिती मिळत आहे. इरा खान आणि नुपूर शिखारे सुट्ट्यांमध्ये आमिर खानच्या महाबळेश्वरच्या फार्महाऊसवरही गेले होते अशी माहिती मिळत आहे. इराने आपल्या आईलाही अर्थात रीना दत्तालाही नुपूर शिखारेबद्दल माहिती दिली. नुपूर शिखारेनी इराचे आणि त्याचे फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर केले आहेत.