मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

VIDEO: आमिर-किरण घटस्फोटानंतरही एकत्र; लडाखमध्ये केला पारंपरिक डान्स

VIDEO: आमिर-किरण घटस्फोटानंतरही एकत्र; लडाखमध्ये केला पारंपरिक डान्स

आमिर खानच्या एका फॅन पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुपचं व्हायरल होतं आहे.

आमिर खानच्या एका फॅन पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुपचं व्हायरल होतं आहे.

आमिर खानच्या एका फॅन पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुपचं व्हायरल होतं आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 15 जुलै- अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि एक्स वाईफ किरण रावचा (Kiran Rao) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतं आहे. यामध्ये (Viral Video) आमिर आणि किरणचा अनोखा अंदाज दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघे चक्क हिमाचल प्रदेशचा पोशाख घालून सुंदर असा पारंपरिक डान्स करत आहेत. हा व्हिडीओ लडाखमधील आहे. सध्या हे दोघेही शुटींगनिमित्त लडाखमध्ये आहेत.
आमिर खानच्या एका फॅन पेजने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खुपचं व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव लडाखचा पारंपरिक पोशाख परिधान करून, पारंपरिक डान्स करत आहेत. सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत. घटस्फोटानंतरदेखील हे दोघे एकमेकांसोबत खुपचं आनंदी दिसून येत आहेत. तर त्यांचे चाहते आणि युजर्स घटस्फोटनंतर या दोघांचा असा बिनधास्त अंदाज पाहून अचंबित होतं आहेत. (हे वाचा:दिशाच्या मेहंदीमध्ये राहुल शोधतोय आपलं नाव; दिशुलचा रोमँटिक व्हिडीओ VIRAL ) किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आमिर खान मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात किरण राव ही सहाय्यक दिग्दर्शक होती. मात्र सेटवर त्यांचं फारसं बोलणं कधी झालं नव्हतं. मात्र त्यांनतर आमिर खानचं आपली पहिली पत्नी रीना दत्तासोबत ज्यावेळी घटस्फोट झाला. त्यावेळी किरण राव आणि आमिर खानचं पहिल्यांदा फोनवर बोलणं झालं होतं. यावेळी जवळजवळ अर्धा तास बोलणं झालं होतं. या संवादानंतर आमिर खानला किरण रावशी बोलायला आवडू लागलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये डेटिंग सुरु झाली होती. मात्र 15 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला आहे.
First published:

Tags: Aamir khan, Bollywood News

पुढील बातम्या