`बॉक्स ऑफिसचा विचार कधीच करत नाही` सध्या आमीर खान हा सर्वात यशस्वी निर्मात्यांपैकी एक आहे. परंतु, त्याने देखील अर्थिकदृष्टया यश मिळवण्यासाठी कधीही फारसा विचार केला नाही. तो म्हणतो की मी कधीही बॉक्स ऑफिस (Box Office) कलेक्शनबाबत विचार करत नाही. मला चित्रपटाचे कथानक आवडले तर तो चित्रपट मी करतो. परंतु आशय नसलेला चित्रपट मी स्विकारत नाही. (हे वाचा:रोहित रॉय होता सुष्मिताचा बॉयफ्रेंड?, पाहा अभिनेत्याची VIRAL पोस्ट ) `माझे वडील फारसा पैसा कमवू शकले नाहीत` आमीरने माध्यमांशी बोलताना सांगितले होते, की माझ्या कुटुंबाला चित्रपटांची पार्श्वभूमी आहे. मी माझे काका (नासिर हुसैन) यांना चित्रपट निर्मिती करताना पाहिलेलं आहे. माझे वडीलदेखील खूप उत्साही आणि चांगले चित्रपट निर्माता होते. परंतु व्यवसाय कसा करावा, याबाबत त्यांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे ते फारसा पैसा कमवू शकले नाहीत. त्यांचा एखादा चित्रपट 8 वर्षांत पूर्ण व्हायचा तर एखादा 3 वर्षांत. मला वाटतं ही त्यांची मुख्य अडचण होती. 40 वर्षांचा माणूस नोकरीसाठी प्रमाणपत्र शोधत होता आमीर खान वडिलांच्या अर्थिक अडचणींविषयी बोलताना म्हणाला की ते मोठ्या कर्जखाली दबून गेले होते. मी माझ्या वडिलांना अनेकदा अर्थिक समस्यांचा सामना करताना पाहिलं आहे. एक वेळ अशी होती की जवळपास आमच्या कुटुंबाचं दिवाळं निघालं होतं आणि आम्ही रस्त्यावर यायचेच बाकी होतो, ही बाब तुम्हाला माहिती आहे की नाही याची मला कल्पना नाही. त्यावेळची एक घटना सांगताना आमीर म्हणतो की मला माझ्या आईनं एकदा सांगितलं की तुझ्या वडिलांना जॉबची गरज असून ते त्याचं पदवी प्रमाणपत्र शोधत आहेत. आमच्यावर अशी वेळ आली होती की 40 वर्षांचा माणूस नोकरीसाठी ग्रॅज्युएशनची प्रमाणपत्र शोधत होता. (हे वाचा:त्या' हिंदी निर्मात्यांवर कारवाई करण्याची धमक दाखवा'अमेय खोपकरांचा सरकारला टोला ) `मी माझ्या प्रेक्षकांना बोअर करत नाही` आमीरने पुढे सांगितले होते, की मला असं वाटतं की कोणत्याही चित्रपटाचा पहिला उद्देश हा मनोरंजन करणं हा असतो. चित्रपटाचे तिकीट खरेदी करुन प्रेक्षक चित्रपटगृहात सोशलॉजी किंवा सायकॉलॉजीचे लेक्चर ऐकायला येत नाहीत. त्यासाठी कॉलेजेस असतात. लोकांना मनोरंजन हवं असतं. त्यामुळे मी माझ्या प्रेक्षकांना बोअर करत नाही. मनोरंजन (Entertainment) करताना मला वाटलं की प्रेक्षकांना काही सांगयचं आहे, तर ते त्याचवेळी सांगतो. मी प्रेक्षकांना केवळ ज्ञान देऊ शकत नाही. परंतु, मनोरंजन आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एकाच चित्रपटातून देऊ शकलो तर ते उत्तमच ठरतं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan