शाहरुखला कोणी केला Kiss? गौरीनं म्हटलं 'Sweetest Couple'

शाहरुखला कोणी केला Kiss? गौरीनं म्हटलं 'Sweetest Couple'

शाहरुख खानचा एक किसचा फोटो व्हायरल झालाय. किंग खानच्या बायकोनं या फोटोचं कौतुकही केलं.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : सध्या शाहरुख खान झीरोच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तरीही तो आपल्या कुटुंबासाठी वेळ काढतो. अबरामसाठी तो खास वेळ काढतो. नुकताच त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झालाय.

गौरी खाननं इन्स्ट्राग्रामवर हा फोटो पोस्ट केलाय. त्यात अबराम शाहरुखला किस करतोय. खूपच सुंदर फोटो आहे तो. गौरीनं त्याखाली लिहिलंय, ही जगातली सर्वात गोड जोडी म्हणावं का?

 

View this post on Instagram

 

Can we just declare them the ‘sweetest’ couple in the world. #lovegoals #kissonforehead

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

आनंद एल राय दिग्दर्शित हा सिनेमा 21 डिसेंबरला रिलीज होतोय. चित्रपटाचा पहिला टीझर पाहिला तर ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ हीच म्हण आठवते. आता बादशाह शाहरुख शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे असं म्हणायला हरकत नाही. अमिताभ यांनी 'पा' चित्रपटात वेगळा लूक केला होता. आता शाहरुखही 'झीरो' चित्रपटातून वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सलमान आणि शाहरुख ही बॉलिवूडची करण- अर्जुन जोडी या सिनेमात दिसणार आहे. निर्मात्यांनी ही युएसपी जाणत सिनेमाच्या टीझरची सुरूवातच दोघांच्या दमदार एण्ट्रीपासून केली. वर्षभरापासून प्रश्नात पाडणाऱ्या टीझरपेक्षा चित्रपटाच्या पोस्टरने आणखी उत्सुकता वाढवली आहे.

चित्रपटात शाहरुखने बवुआ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. सध्या बवुआचे अनेक फोटो सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहेत. फोटोप्रमाणेच चित्रपटातील अनेक वाक्य चाहत्यांच्या तोंडी आहेत. त्यातीलच एक ‘ब से बवुआ आ राहा है’ हे वाक्य तुम्हाला चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक करतं.

First published: November 30, 2018, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading