माझी बायको म्हणत किरण रावबद्दल काय सांगतोय आमिर खान?

माझी बायको म्हणत किरण रावबद्दल काय सांगतोय आमिर खान?

आमिर खान कधी काय करेल हे कुणीच सांगू शकत नाही. नुकताच इंटरनेटवर एक फोटो समोर आलाय. आमिरनं हा फोटो स्वत: शेअर केलाय.

  • Share this:

मुंबई, 22 मार्च : आमिर खान कधी काय करेल हे कुणीच सांगू शकत नाही. नुकताच इंटरनेटवर एक फोटो समोर आलाय. आमिरनं हा फोटो स्वत: शेअर केलाय. त्याखाली लिहिलंय, जगातली सर्वात क्युट ...माझी बायको. आमिर खानचा हा फोटो खूप व्हायरल झालाय. एका तासात 90 हजार लोकांनी तो लाइक केलाय. आमिरचे फॅन्स या फोटोतल्या आमिरच्या मराठमोळ्या लूकचं कौतुक करतायत.

आमिर खान आणि किरण राव यांनी हे लूक का घेतलंय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आमिरनं काही सांगितलं नाही. पण या फोटोच्या मागे पाहिलं की कुठला तरी सेट दिसतोय. कदाचित आमिर एखाद्या मराठी शोचा गेस्ट असू शकतो.

View this post on Instagram

The cutest in the world... mazi baiko ❤

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

मराठी लूकबरोबर आमिरचं वृद्ध व्यक्तीचं लूकही फॅन्सना संभ्रमात पाडतंय. पण तो पेहराव जाहिरातीसाठी केलाय. कुठल्या नव्या सिनेमासाठी नाही.

आमिर खानच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून, ऑस्कर विजेता हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'च्या रिमेकमध्ये आमिर झळकणार आहे. 'लाल सिंग चढ्ढा' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं लेखन अतुल कुलकर्णीनं केलंय. आमिरनं त्याच्या वाढदिवसाला याची घोषणा केली.

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्स आॅफ हिंदोस्तान' बाॅक्स आॅफिसवर सपशेल आपटला. चित्रपटाची खूप हवा असल्यानं पहिल्या दिवशी सिनेमानं 50 कोटींच्या वर कमावले. पण नंतर सिनेमाला उतरती कळा लागली. सिनेमावर प्रचंड टीका सुरू झाली. समीक्षकांनीही सिनेमाला सोडलं नाही.प्रेक्षकांनीही वेगवेगळे मिम्स करायला सुरुवात केली.

आमिर खान झाला म्हातारा, पाहा VIDEO

First published: March 22, 2019, 4:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading