Elec-widget

आलियाच्या 'राजी'चं पोस्टर रिलीज

आलियाच्या 'राजी'चं पोस्टर रिलीज

हा सिनेमा हरिंदर सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत ए नॉवेल' या कादंबरीवर आधारित आहे.

  • Share this:

11 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आगमी सिनेमा 'राजी'चं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या सिनेमाचं दिग्दर्शन करण्याऱ्या रही गुलजारनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर रिलीज केलंय.

या पोस्टरमध्ये आलियाने काश्मिरी सूट आणि मोठे झुमके घातले आहेत. तिचा हा हटके लूक तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे. राजी हा सिनेमा पुढच्या वर्षीच्या 11 मे ला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमामध्ये आलियाच्या विरुद्ध विक्की कौशल झळकणार आहे. याआधी विक्कीने 'मसान' आणि 'रमन राघव' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.  इतकचं काय तर आलियाची आई सोनी राजदानही या सिनेमात काम करत आहे. रणवीर कपूरही या सिनेमामध्ये आहे.

करण जौहरनेही या सिनेमाचं पहिलं पोस्टर आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे.

या सिनेमामध्ये आलिया एक काश्मिरी मुलगी आहे. ती एका पाकिस्तानी सेना अधिकाऱ्याच्या प्रेमात पडते. याच दोघांच्या प्रेमाची कथा या सिनेमात दाखवली आहे. हा सिनेमा हरिंदर सिक्का यांच्या 'कॉलिंग सहमत ए नॉवेल' या कादंबरीवर आधारित आहे.  या सिनेमाचं शुटिंग पंजाब, काश्मिर आणि मुंबईत होणार आहे. लवकरच या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे.

Loading...

Six months to RAAZI!

A post shared by Alia ✨⭐️ (@aliaabhatt) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...