सलमानच्या ‘राधे’मधील ‘ती’ 20 मिनिटं असणार खास, भाईजाननं खर्च केलेत करोडो रुपये

सलमानच्या ‘राधे’मधील ‘ती’ 20 मिनिटं असणार खास, भाईजाननं खर्च केलेत करोडो रुपये

सलमान खानच्या ‘भारत’ आणि ‘दबंग 3’ नंतर त्याच्या चाहत्यांना त्याचा आगामी सिनेमा ‘राधे’ बद्दल बरीच उत्सुकता आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : सलमान खानच्या ‘भारत’ आणि ‘दबंग 3’ नंतर त्याच्या चाहत्यांना त्याचा आगामी सिनेमा ‘राधे’ बद्दल बरीच उत्सुकता आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. या सिनेमात अभिनेत्री दिशा पाटनी सलमान खान सोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या सिनेमाबाबत आता सर्वात मोठी माहिती समोर आली आहे. या सिनेमातील क्लायमॅक्सची 20 मिनिटं खूप खास असणार आहेत. या सिनेमाच्या क्लायमॅक्ससाठी सलमाननं करोडो रुपये खर्च केले आहेत.

रिपोर्टनुसार सलमानचा आगामी सिनेमा ‘राधे’च्या क्लायमॅक्समध्ये VFX इफेक्ट वापरले जाणार आहेत. हा सीन जवळापास 20 मिनिटांचा असणार आहे. ज्यात रणदीप हुड्डा आणि सलमान खान यांच्यात जबरदस्त फाइट पाहायला मिळणार आहे. हा सीन खरं तर स्टुडीओमध्ये शूट केला जाणार आहे. ज्यात क्रोमा टेक्नॉलॉजीची मदत घेण्यात आली आहे. या 20 मिनिटांच्या सीनसाठी सलमाननं तब्बल 7.50 कोटी खर्च केले आहेत.

बॉलिवूडपासून दूर पण ग्लॅमरच्या बाबतीत करिनालाही मागे टाकते कपूर घराण्याची लेक

 

View this post on Instagram

 

#radhe 640 pounds leg press .. Training to take on the most wanted bhai @beingsalmankhan आप कितना प्रेस की रहे हो ब्रधर 😜 Giving it my best, this is my #mondaymotivation. What is yours? #training #bodybuilding #movies #actor #actorslife #radheeid2020

A post shared by Randeep Hooda (@randeephooda) on

सलमानच्या राधेमध्ये वापरली जाणारी क्रोम टेक्नॉलॉजी बाहुबली आणि बाहुबली 2 मध्ये वापरण्यात आली होती. ही टेक्नॉलॉजी खूप महागडी आहे. यात सीन शूट करताना निळ्या आणि हिरव्या रंगाचं बॅकग्राउंड वापरलं जातं. पण यात वापरली जाणारी लाइट ही खूप महागडी असते. त्यानंतर VFX मध्ये यातील बॅकग्राउंड डिजिटली काढून टाकलं जातं आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला हवं असलेलं बॅकग्राउंड लावलं जातं.

भाईजाननं सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन हिसकावला, सलमानची दबंगगिरी कॅमेऱ्यात कैद

सूत्राच्या माहितीनुसार या सिनेमातील फायनल सीन हा दुबईमध्ये शूट करण्यात येणार आहे. तर सिनेमाचं बहुतांश शूट हे दिल्ली, कोलकाता, जयपूर आणि लखनऊमध्ये केलं जाणार आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स स्टुडिओमध्ये शूट होणार असून यात सलमान-रणदीप यांच्यातील अ‍ॅक्शन सीन पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रभुदेवा करत आहे. सलमानच्या दबंग 3चं दिग्दर्शनही प्रभुदेवानंच केलं होतं.

या सिनेमातून सलमान खान आणि दिशा पाटनी ही जोडी पहिल्यादा एकत्र येणार आहे. याआधी दिशानं सलमाच्या भारतमध्ये सहाय्यक कलाकार म्हणून दिसली होती. याशिवाय या सिनेमात जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाबाबत दिशा पाटनी खूपच उत्साहित आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत या सिनेमाबाबात बोलताना पुन्हा एकदा मी सलमानसोबत काम करेन असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया दिशानं दिली होती.

रात्रीस खेळ चाले ‘छेडछाडीचा’! अण्णा शेवंताचे फोटो पाठवणाऱ्या होमगार्डला बेड्या!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 29, 2020 10:03 AM IST

ताज्या बातम्या