ऐश्वर्या राय माझी आई, 32 वर्षीय तरुणाने केला दावा

ऐश्वर्या राय माझी आई, 32 वर्षीय तरुणाने केला दावा

एवढंच नाहीतर, आपला जन्म हा 1998 मध्ये झाला. त्यावेळी ऐश्‍वर्या राय (Aishwarya Rai) या 15 वर्षांच्या होत्या.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : काही दिवसांपूर्वी एका महिलेनं गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांची मुलगी असल्याचा दावा केला होता. आता आणखी एक प्रकरण समोर आले असून एका 32 वर्षीय तरुणाने थेट बॉलिवूड अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सून ऐश्‍वर्या राय बच्‍चन (Aishwarya Rai Bachchan) यांचा मुलगा असल्याचा दावा केला आहे.  एवढंच नाहीतर, आपला जन्म हा 1988 मध्ये झाला. त्यावेळी ऐश्‍वर्या राय (Aishwarya Rai) 15 वर्षांची होती.

स्‍पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचे नाव संगीत कुमार आहे. त्याने दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या राय ही माझी आई असल्याचा दावा केला आहे. माझा जन्म हा आईवीएफ (इन विट्रो फर्टिलाइजेशन) द्वारे लंडनमध्ये झाला आहे, असं या तरुणाचं म्हणणं आहे.

संगीत कुमारने असाही दावा केला आहे की, ऐश्वर्या राय हिच्या आई-वडिलांनी माझी 2 वर्ष देखभाल केली होती. त्यानंतर वडील वेदीवेलू रेड्डी  हे विशाखापट्टणम इथं घेऊन आले. तसंच त्याच्या नातेवाईकांनी त्यांच्या जन्मासंबंधीत सर्व कागदपत्र हे नष्ट करून टाकले आहे. जर कागद पत्र असते तर नक्की हा ठोसा पुरावा असता, असंही संगीत कुमारने सांगितलं.

ऐश्वर्या रायचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या संगीत कुमारला आपल्या आई अर्थात ऐश्वर्या राय सोबत मुंबई राहायचं आहे.

अनुराधा पौडवाल माझी आई, केरळच्या महिलेचा दावा; कोर्टात दाखल केला 50 कोटींचा दावा

दरम्यान, प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या आपल्या आई असल्याचा दावा केरळमधल्या एका महिलेनं केला. करमाला मोडेक्स असं त्यांचं नाव असून त्या 45 वर्षांच्या आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. करलमाला यांनी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला असून अनुराधा पौडवाल यांच्याकडे त्यांनी 50 कोटींची नुकसानभरपाई मागतली आहे. तिरूअनंतरपुरम कोर्टाने पौडवाल यांना नोटीस बजावली असून 27 जानेवारीला कोर्टात हजर राहायला सांगितलंय.

करमाला यांनी आपल्या वकिलासोबत एक पत्रकार परिषद घेऊन हा मोठा दावा केलाय. करमाला यांनी सांगितलं की, त्या फक्त चार वर्षांच्या होत्या तेव्हा अनुराधा पौडवाल यांनी त्यांना केरळच्या त्यांच्या मित्राच्या हवाली केलं होतं. पोंनाचन आणि अगनेस असं त्यांच्या केरळच्या पालकांचं नाव आहे.

40 वर्षांपूर्वी पौंडवाल दाम्पत्यांनी त्यांना केरळला ठेवलं होतं. त्यांचे वडिल पोंनाचन यांचं 5 वर्षांपूर्वी निधन झालंय. त्या आधी त्यांनी करमाला यांना खरी परिस्थिती सांगितली होती. अनुराधा पौडवाल या त्या काळात गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये अतिशय व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांनी असं केलं असावं असंही त्यांनी सांगितलं.

अनुराधा पौडवाल भडकल्या

दरम्यान, या दाव्यावर अनुराधा पौडवाल चांगल्याच भडकल्या. केवळ प्रसिद्ध मिळविण्यासाठी या महिलेने हे आरोप केले आहेत. त्यांना पैसे उकळायचे असून त्यासाठीच त्यांनी हे आरोप केलेत. या महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, अशी पहिली प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, माझ्या कविता या मुलीचा जन्म 1997 सालचा आहे. एखा

ऐश्वर्या रायचा मुलगा असल्याचा दावा करणाऱ्या संगीत कुमारला आपल्या आई अर्थात ऐश्वर्या राय सोबत राहायचं आहे. दा कुत्रा भुंकत असेल तर तुम्ही माझ्याकडूनही भुंकण्याची अपेक्षा करू शकत नाही. कोर्टाने नोटीस पाठविण्याच्या कृतीवरही त्यांनी शंका व्यक्त केली. कोर्टाने कुठल्या आधारावर हे प्रकरण दाखल करून घेतलं असा प्रश्न त्यांनी विचारला.

Published by: sachin Salve
First published: January 12, 2020, 10:18 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading