करीना कपूरमुळे बॉबी देओल 'Jab We Met'मधून झाला होता बाहेर? मग झाली शाहिद कपूरची एंट्री

करीना कपूरमुळे बॉबी देओल 'Jab We Met'मधून झाला होता बाहेर? मग झाली शाहिद कपूरची एंट्री

सुपरहिट सिनेमा जब वी मेट (Jab We Met) मध्ये करीना कपूरबरोबर (Kareena Kapoor) बॉबी देओल स्क्रीन शेअर करणार होता, मात्र काही कारणास्तव बॉबी देओलला शाहिद कपूरने रिप्लेस (Shahid Kapoor) केले होते.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : याच महिन्यात बॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा 'जब वी मेट' (Jab We Met)ला 13 वर्ष पूर्ण होत आहेत. अभिनेत्री करीना कपूरने (Kareena Kapoor) ने याच सिनेमाची आठवण शेअर करताना शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali)  यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान या सिनेमाची कहाणी जितकी रंजक आहे त्यापेक्षी कित्येक पटींनी रंजक यामागचे किस्से देखील आहेत. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या सिनेमामध्ये हिरो म्हणून शाहिद नव्हे तर बॉबी देओल (Bobby Deol) दिसणार होता. पण बॉबी सिनेमातून बाहेर झाला आणि त्याची जागा शाहिदने घेतली. आजही ही आदित्य-गीतची जोडी अनेकांची 'फेव्हरिट' आहे.

View this post on Instagram

'Mujhe toh lagta hai life mein jo kuch insaan real mein chahta hai, actual mein, usse wohi milta hai' ❤️❤️ #13YearsOfJabWeMet @imtiazaliofficial @shahidkapoor #ShreeAshtavinayakCineVision

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

बॉबी देओल 'आदित्य'च्या भूमिकेसाठी पहिली पसंत होता, याबाबतचा खुलासा स्वत: बॉबी देओलने केला होता. हिंदूस्तान टाइम्सच्या एका अहवालानुसार बॉबी देओलने एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली होती की असे काय झाले की त्याची जागा शाहिदने घेतली. बॉबीने असे म्हटले की तो देखी अभय देओलने इम्तियाज अलीबरोबर केलेला सिनेमा  'सोचा ना था' पाहून खूपच इम्प्रेस झाला होता. त्यामुळे त्याने इम्तियाजबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला जेव्हा 'जब वी मेट'ची ऑफर मिळाली तेव्हा त्याने ती त्वरित स्विकारली. त्यावेळी या सिनेमाचे नाव 'गीत' असे निश्चित करण्यात आले होते.

(हे वाचा-'ती' ड्रग पार्टी नव्हतीच! करण जोहरच्या पार्टीत आलेल्या कलाकारांना NCBचा दिलासा)

बॉबी देओलने असे म्हटले होते की, त्याने या सिनेमासाठी करीनाचे नाव सुचवले होते. त्यावेळी निर्माते आणि करीना या सिनेमासाठी तयार नव्हते. मात्र काही  दिवसांनी त्याच्या वाचनात आले की करीनाने सिनेमासाठी होकार दिला आहे आणि त्याच्या जागी सिनेमात शाहिदने एंट्री घेतली आहे. मीडिया अहवालात असे म्हटले आहे की करीनाने बॉबी देओलच्या जागी शाहिद कपूरला घेण्यास सांगितले होते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 28, 2020, 7:32 AM IST

ताज्या बातम्या