मुंबई, 04 मार्च : अजय देवगण सोबत तान्हाजी सिनेमात काम केल्यानंतर अभिनेत्री काजोल आता शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अवघ्या 13 मिनिटांचा हा व्हिडीओ तुमचं मन हादरवून टाकतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं ‘देवी’ ही शॉर्ट फिल्म नुकतीच युट्यूबवर रिलीज करण्यात आली. या शॉर्टफिल्मचं दिग्दर्शन प्रियांका बॅनर्जीनं केलं आहे.
'देवी' ही कथा आहे अशा 9 महिलांची ज्या वेगवेगळ्या परिस्थितीतून बाहेर पडून एका अशा ठिकाणी पोहचल्या आहेत. जिथे त्यांचं स्वतःचं असं कोणीही नाही. या शार्ट फिल्ममध्ये काजोलसोबतच नेहा धूपिया, श्रुति हसन, शिवानी रघुवंशी, नीना कुलकर्णी, संध्या म्हात्रे, रमा जोशी, मुक्ता बार्वे, रश्विवनी दयामा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
रानू मंडलवर पुन्हा आली स्टेशनवर गाण्याची वेळ? चाहत्यांवर रागावणं पडलं महागात
या शॉर्ट फिल्ममधील साम्य हे आहे की यातील सर्व महिला या पुरुष प्रधान संस्कृतीतील मर्दांच्या मर्दानगीची शिकार झाल्या आहेत. 13 मिनिटांमध्ये या महिला आपापलं दुःख व्यक्त करताना दिसणार आहे. जे त्या आजही विसरू शकलेल्या नाही. इतक्यात घराची बेल वाजते. ज्यामुळे त्या प्रत्येक स्त्रीचं दुःख उफाळून येतं. बाहेरुन जी येईल तिला आपल्यात सामावून घ्यायला त्या तयार नसतात. मात्र दरवाजा उघडल्यानंतर त्यांच्यासमोर जे येतं ते पाहिल्यावर तुम्हीही हैराण व्हालं.
सई ताम्हणकरच्या पायाला दुखापत, त्याच अवस्थेत करते आहे सिनेमाचं शूटिंग
महिलांच्या दाबलेल्या भावनाना वाट करुन देणाऱ्या या शॉर्ट फिल्मचा 13 मिनिटांचा व्हिडीओ डोळ्यात अंजन घालणारा ठरतो. या शॉर्ट फिल्ममध्ये काजोल मराठीमध्ये बोलताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेली ही शॉर्ट फिल्म सध्या युट्यूबवर ट्रेंडमध्ये आहे.
‘मी अद्याप जिवंत आहे ते केवळ तिच्यामुळेच’ अभिनेता इरफान खान झाला भावुक
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.