VIDEO : बाथटब घेतेय प्रियांका; निकच्या गाण्यामुळे व्हायरल झाला फोटो

प्रियांकानं या गाण्यातला फोटो शेअर केलाय. त्यात ती टबबाथमध्ये आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 2, 2019 04:21 PM IST

VIDEO :  बाथटब घेतेय प्रियांका; निकच्या गाण्यामुळे व्हायरल झाला फोटो

मुंबई, 02 मार्च : बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचं निक आणि त्याच्या भावाच्या अल्बममधलं गाणं सध्या व्हायरल होतंय. या गाण्यात तिची जाऊबाई सोफी टर्नरही आहे. प्रियांकानं या गाण्यातला हा फोटो शेअर केलाय. त्यात ती टबबाथमध्ये आहे.


प्रियांकाचा हेवी मेकअप आहे. डोक्यावर फुलं आहेत. हे गाणं आहे Sucker. जोनस ब्रदर्सनी ते गायलंय. हे गाणं खूप व्हायरल झालंय. त्यात प्रियांकानं वेगवेगळे ड्रेसेस घातलेत. प्रियांका-निक, सोफी-डेनियल गाण्यात खूप धमाल करतायत.


मध्यंतरी प्रियांकाच्या भावाची रोका सेरिमनी झाली. प्रियांकानं भाऊ-वहिनीचा फोटो शेअर केला होता. तिची वहिनी इशिताचं तिनं कुटुंबात स्वागत केलं होतं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 04:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...