अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा दान, आदित्य ठाकरेंनी मानले आभार

अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा केले प्लाझ्मा दान, आदित्य ठाकरेंनी मानले आभार

कोरोनावर मात करणारी बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानीने दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान केले आहे.

  • Share this:

मुंबई, 27 मे : कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी संपूर्ण जग विविध पातळीवर प्रयत्न करत आहे. दरम्यान भारत सरकारकडून देखील विविध योजना राबवण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत देशातील सेलिब्रिटी, बॉलिवूड कलाकार विविध पद्धतीने सरकारची मदत करत आहेत. अभिनेत्री झोया मोरान (Zoa Morani) हिने देखील एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. झोया एक कोरोना सरव्हायवर आहे. कोरोनावर मात करणाऱ्या झोयाने दुसऱ्यांदा प्लाझ्मा दान केले आहे. याबाबत तिने ट्विटरवरून माहिती दिली. तिच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. दरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी देखील झोयाचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विटरवरून झोयाचे आभार मानले आहेत.

(हे वाचा-'अम्फान'च्या हाहाकारानंतर मदतीसाठी सरसावला शाहरूख, करोडोंची देणार मदत)

झोयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्लाझ्मा दान करण्यासंदर्भात आवाहन देखील केले आहे.

याआधीही झोयाने नायर रुग्णालयात प्लाझ्मा दान केला होता. त्यावेळी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कृती करण्याबाबतचा आनंद व्यक्त केला होता. यावेळी तिने डॉक्टरांचे आभार देखील मानले होते.

महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशावेळी स्वत:हून पुढाकार घेत आवश्यक मदत करण्याचे आवाहन सर्वच कलाकार, सेलिब्रिटी आणि सरकारकडून करण्यात येत आहे.

First published: May 27, 2020, 10:25 PM IST

ताज्या बातम्या