Big Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे

Big Boss 12 : अनुप जलोटा- जसलीनच्या नात्याबद्दल मीच संभ्रमात- नेहा पेंडसे

'मी बिग बाॅसच्या घरात गेले ते माझं भाग्यच समजते. तिथे गेल्यावर मला जाणवलं की घरात गेल्यावर जे काॅमनर्स होते, त्यांना इथे येण्यासाठी खूप धडपड करावी लागली.' नेहा सांगते

  • Share this:

मुंबई, 15 आॅक्टोबर : यावेळी 'बिग बाॅस 12'मधून नेहा पेंडसे बाहेर पडली. बिग बाॅसच्या घरात यावेळी ती एकमेव मराठी अभिनेत्री होती. बिग बाॅसमधल्या अनुभवाबद्दल विचारायला आम्ही नेहाला गाठलं. न्यूज18लोकमतच्या वेबसाईटशी ती दिलखुलासपणे बोलली.

'मी बिग बाॅसच्या घरात गेले ते माझं भाग्यच समजते. तिथे गेल्यावर मला जाणवलं की घरात गेल्यावर जे काॅमनर्स होते, त्यांना इथे येण्यासाठी खूप धडपड करावी लागली. तुम्हाला त्या मानानं लवकर संधी मिळते. ते जगच खूप वेगळं आहे आणि ते एकदा अनुभवायला मिळालं पाहिजे.' नेहा सांगते.

नेहा बाहेर पडली ते अनेकांना वाईट वाटलं. मराठी प्रेक्षकांबरोबर दाक्षिणात्य प्रेक्षकांनाही वाईट वाटल्याचं नेहा सांगते. ' बिग बाॅसच्या घरात मला तसा कोणापासूनच त्रास नव्हता. म्हणूनच मला बाहेर पडावं लागलं,' नेहा तिची खंत व्यक्त करते. ती पुढे सांगते, ' दीपिकाबरोबर माझं तसं जमलं होतं, पण त्रास तसा सबानं दिला. कारण टास्कमध्ये ती अॅग्रेसिव्ह व्हायची.'

कोणापासून त्रास नाही असं सांगूनही नेहानं स्पर्धकांचं खरं रूप उघड केलंच. ती म्हणाली, ' आतले लोक खूप गेम्स खेळतात.मी गेम खेळत नव्हते. मी क्षमाशाली होते, जेन्युइन होते. मी घरातली पिसमेकर होते. दोन लोकांमध्ये भांडणं सुरू झाली, तर मी त्यांना शांत करायचे. पण या स्वभावाचा बिग बाॅसच्या घरात काहीच उपयोग नव्हता. '

नेहाचं म्हणणं या तिच्या स्वभावामुळे घरात ती सर्वांना आवडायची, पण यामुळेच तिला बाहेर पडावं लागलं, असं तिला वाटतं. आता नेहा बाहेर पडल्यावर काय मिस करते? ' बिग बाॅसच्या घरात रुटिन समजण्यासाठीच दोन आठवडे जातात. रविवारी एलिमेनेशन, सोमवारी टास्क, बुधवारी जेल अशा सगळ्या गमती मी नक्कीच मिस करेन,' नेहा म्हणते तिला टास्क करायला खूप आवडायचं. ' मी टास्कमध्ये खूप चांगली होते. पुरुषांशी स्पर्धा करायचे. लक्झरी टास्क आणि कॅप्टन्सी टास्क कठीण असायचं. '

नेहाला घरातलं सकाळचं वातावरणही आवडायचं. ती म्हणते, ' गाणं लावून आम्हाला उठवायचे. त्या गाण्यातच खरं तर एखादं टास्क दडलेलं असायचं किंवा कोण गेस्ट येणार ते कळायचं. ते मी नक्कीच मिस करते.'

बिग बाॅसची यावेळी जास्त चर्चा झाली ती अनुप जलोटा आणि जसलीन यांच्या जोडीमुळे. ती या जोडीकडे कशी पाहते. ही जोडी खरी आहे की खोटी? नेहा यावर म्हणाली, 'मलाच याबद्दल संभ्रम आहे. बाहेर लोक म्हणतात की त्यांच्यात प्रेम जाणवत नाही. जसलीन तर म्हणाली होती ते तीन वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे काहीच कळत नाही. मी बाहेर आल्यावर मला असंही कळलं की सौरभ शेतकरी नाही. '

त्या दोघांशी तिचे संबंध कसे होते? नेहा सांगते, 'अनुप जलोटांशी फारसे चांगले नव्हते. ते न्यूट्रल होते. पण गेली दहा दिवसात मी आणि जसलीन जास्त जवळ आलो.'

नेहाला विचारलं, तुला बिग बाॅसमध्ये पुन्हा जायला आवडेल का? यावर तिचा उत्साहानं होकारच होता. ' मी यावेळी ज्या चुका केल्या, त्या पुन्हा तिथे गेले तर करणार नाही.'

नेहा आता बिग बाॅस बघेल, तेव्हा तिच्या काय भावना असतील? ती म्हणाली, 'जे होतं आणि जे दाखवलं जातं त्या मधलं मला ओळखता येईल. कारण माझ्या बाबतीतही हेच झालं. मी जे काही बोलले होते ते दाखवलंच नव्हतं.' आणि नेहानं एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. तिथले लोक दाखवतात एक आणि असतात दुसरेच. त्यांचं खरं रूप समोर येतंच नाही.

सुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी

First published: October 15, 2018, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading