बॉबी डार्लिंगने केला पतीवर हिंसाचाराचा आरोप

बॉबी डार्लिंगने केला पतीवर हिंसाचाराचा आरोप

बॉबीचं 2014 साली रमणिकशी लग्न झालं होतं.

  • Share this:

05 सप्टेंबर: सिने कलाकार बॉबी डार्लिंगने आपला पती रमणिक शर्मावर हिंसाचार करण्याचा आरोप केला आहे. बॉबीचं 2014 साली रमणिकशी लग्न झालं होतं.

रमणिक आणि बॉबीची भेट एका सोशल नेटवर्किंग साईटवर झाली होती. चॅट करू लागल्यावर 15च दिवसात बॉबीला रमणिकने लग्नाची मागणी घातली होती. त्यासाठी बॉबीने सेक्स चेंज ऑपरेशन केलं. लग्नानंतर बॉबी डार्लिंगने स्वत:चे नाव बदलून पाखी शर्मा ठेवलं.

पण लग्नानंतर काही दिवसातच रमणिकने खरे रंग दाखवायला सुरूवात केली असं बॉबीचं म्हणणं आहे. तो दारू प्यायचा आणि त्यानंतर बॉबीला प्रचंड मारहाण करायचा असंही बॉबीने सांगितलं. अखेर लग्न झाल्यावर एका वर्षाने बॉबीने रमणिक घरी नसताना घरातून पळ काढला आणि सरळ दिल्ली गाठली.

अजूनही बॉबीला आपला डावा हात पूर्णपणे हलवता येत नाही आणि चालताना लंगडत चालावं लागतं.

आता बॉबीने रमणिकपासून घटस्फोट मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2017 02:18 PM IST

ताज्या बातम्या