बॉबी देओलच्या 'आश्रम' वेब सीरिजवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या अटकेची मागणी

बॉबी देओलच्या 'आश्रम' वेब सीरिजवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या अटकेची मागणी

बॉबी देओल स्टारर (Bobby Deol) वेबसीरिज (Web Series) आश्रम (Aashram) वर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या वेब सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांचा निषेध सोशल मीडियावर केला जात आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल स्टारर (Bobby Deol) वेब सीरिज आश्रम (Aashram) दुसऱ्या सीझनबाबत अधिक चर्चेत आली आहे. या सीरिजचा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर याबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकांनी विविध प्लॅटफॉर्मवर या सीरिजबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ही सीरिज बॅन करण्याची मागणी केली जात आहे, त्याचप्रमाणे सीरिजचे दिग्दर्शक प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या अटकेची मागणी देखील सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे. या सीरिजवर अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला जात आहे.

प्रकाश झा 'आश्रम'चा दुसरा सीझन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. शुक्रवारी याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर लोकांनी या सीरिजला विरोध केला आहे. हिंदू धर्माच्या भावनांना यामुळे ठेच पोहोचवल्याचा आरोप होतो आहे. या सीरिजमधून हिंदू धर्माचा चुकीचा प्रचार होत असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. सोशल मीडिया युजर मोठ्या प्रमाणात त्यांचा राग विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्यक्त करत आहेत.

ट्विटरवर #PrakashJhaAttacksHinduFaith आणि #Arrest_Prakash_Jha असे हॅशटॅग देखील ट्रेंड होत आहेत.

दरम्यान याप्रकरणी प्रकाश झा आणि त्यांच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही आहे. आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की लोकांची नाराजी पाहता मेकर्सकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते. एमएक्स प्लेअरवरील 'आश्रम' ही सीरिज आहे. बॉबी देओल यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याने 'काशीपूरवाले बाबा निराला' ही भूमिका साकारली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 28, 2020, 5:06 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या