Home /News /entertainment /

bobby darling पुन्हा आली चर्चेत, बऱ्याच दिवसांनी सेल्फी शेअर करत म्हणाली...

bobby darling पुन्हा आली चर्चेत, बऱ्याच दिवसांनी सेल्फी शेअर करत म्हणाली...

bobby darling

bobby darling

बॉबी डार्लिंग (bobby darling )बऱ्याच दिवसांपासून दिसत नव्हती पण आता बऱ्याच दिवसांनी तिनं तिचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  मुंबई, 13 डिसेंबर: तुम्हाला बॉबी डार्लिंग (bobby darling)आठवतेय का? हो तीच बॉबी डार्लिंग, जी बारमध्ये डान्स करायची. जिने अनेक चित्रपटांमध्ये गे च्या भूमिका (LGBTQ) साकारल्या आहेत. जिने तिचं लिंग बदललं. तीचे वैवाहिक जीवन सुद्धा दुःखाने भरलं होतं आणि जिला पॅरालिसिसचा झटकाही सहन करावा लागला होता. बऱ्याच दिवसांनी तिने आपल्या सोशल अकाउंटवर सेल्फी शेअर केल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. बॉबी डार्लिंग बऱ्याच दिवसांपासून दिसत नव्हती पण आता बऱ्याच दिवसांनी तिनं तिचा सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती खूप वेगळी दिसत आहे. बॉबी डार्लिंगचे खरे नाव पंकज शर्मा आहे पण नंतर त्याने आपले नाव बदलून पाखी शर्मा ठेवले. बॉलिवूड इंडस्ट्रीत तिला बॉबी डार्लिंग या नावानेच ओळखले जाते. बॉबी डार्लिंगने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने चष्मा घातलेला दिसत आहे. सोबतच तिने स्वेटरही परिधान केला आहे. या लुकमध्ये तिनं तिचे केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये बॉबी डार्लिंग खूपच वेगळी दिसत आहे. हा सेल्फी शेअर करताना तिने खास कॅप्शनही दिली आहे. 'शेवटी चष्मा घातलाच. खूप दिवसांनी सिनेमा बघायला थिएटरमध्ये आलेय. चंदीगड करे आशिकी हा एक अतिशय गोड चित्रपट असून एक मजबूत संदेशही देतो. तुम्हीही जरूर पहा.' असे बॉबीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Pakhi Sharma (@darlingbobby)

  चंदिगड करे आशिकी या चित्रपटात आयुषमान खुराना आणि वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. अभिषेक कपूरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. बॉबी डार्लिंगनेही आपल्या संघर्षमय जीवनाचे चित्रण करणारा चित्रपट बनवावा, अशी इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. आयुषमान खुरानाने तिची भूमिका साकारावी अशी तिची इच्छा आहे. कारण तोच तिच्या भूमिकेला न्याय देऊ शकतो, असा तिचा विश्वास आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment

  पुढील बातम्या