Home /News /entertainment /

BMC चा अजब कारभार: 24 तासांत कंगनाचं ऑफिस तोडलं; शेजारच्या मनीष मल्होत्राच्या बांधकामाला मात्र..

BMC चा अजब कारभार: 24 तासांत कंगनाचं ऑफिस तोडलं; शेजारच्या मनीष मल्होत्राच्या बांधकामाला मात्र..

या दोघांनाही पालिकेने एकाच दिवशी नोटीस दिली होती, कंगनाचे कार्यालय 24 तासांत तोडण्यात आल्या..शेजारील सेलिब्रिटीला मात्र चांगली मुदत देण्यात आली

    मुंबई, 9 सप्टेंबर : सध्या देशभरात एकच विषय मोठ्या प्रमाणात चर्चीला जात आहे. तो म्हणजे कंगना रणौत विरुद्ध शिवसेना. कंगनाने यापूर्वीही सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर तोफ डागली होती. त्यात तिने मुंबईची पीओकेशी तुलना केल्यानंतर मात्र वातावरण अधिक पेटलं. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता आणि नेते संजय राऊत यांनी कंगणावर टीका केली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच होती. त्यात संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला होता. यावर चिडलेल्या कंगनाने 9 सप्टेंबरला मुंबईत येणार असल्याचे सांगितले होते, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं खुलं आव्हान तिने दिलं होतं. कंगनाला गृह मंत्रालयाने Y प्लस दर्जाची सुरक्षा दिली होती. त्यात पालिकेने कंगनाच्या कार्यालयातील काही भाग अनधिकृत असल्याचे सांगून तो तोडला. यानंतर देशभरात नवं वादळ सुरू झालं आहे. आता या प्रकरणात नवी गोष्ट समोर आली आहे. पालिकेने कंगनासह तिच्या कार्यालयाच्या शेजारी प्रसिद्ध फॅशन डिजायनर मनीन मल्होत्रालाही नोटीस पाठवली होती. मात्र नोटीस दिल्यानंतर काही तासात त्यांनी कंगनाचे कार्यालय तोडले. तर मनीष मल्होत्राला 7 दिवसांची मुदत दिली, अशी माहिती समोर आली आहे. हे ही वाचा-"कंगना महाराष्ट्राची पुढील CM होईल असं दिसतंय आणि जेव्हा असं होईल तेव्हा..." यानंतर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एकाच प्रकरणात पालिकेने घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेवरील सवाल उपस्थित केला जात आहे. कंगनाबरोबरच मनीषच्या कार्यालयातही अवैध बांधकाम झाल्याचं दिसत आहे. या दोघांनाही पालिकेने एकाच दिवशी नोटीस दिली होती. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राला अवैध बांधकाम प्रकरणी कारणे दाखवा नोटीस, आणि 7 दिवसांची मुदत देण्यात आली. कंगनाला मात्र स्टॉप वर्क नोटीस, आणि 24 तासांची मुदत देण्यात आली होती. मनीष मल्होत्राचा बंगला क्रमांक 6 तर कंगनाचा बंगला क्रमांक 5 आहे. रहिवासी असलेल्या बंगल्याचे व्यावसायिक ऑफिसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. तळमजल्यावर केबिन उभारण्यात आल्या आहेत तर दुसऱ्या मजल्याच्या टेरेसवर शेड उभारण्यात आलं आहे. पालिकेने कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानं भाजपच्या अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. जर तिचे कार्यालय अवैध होते तर यापूर्वी का तोडले नाही. हा प्रकार सूडबूद्धीचे झाल्याचा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Kangana ranaut

    पुढील बातम्या