मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आलिया भट्टविरोधात FIR दाखल करणार BMC; कोरोना नियमांचं उल्लंघन करत दिल्लीला पोहोचली होती अभिनेत्री

आलिया भट्टविरोधात FIR दाखल करणार BMC; कोरोना नियमांचं उल्लंघन करत दिल्लीला पोहोचली होती अभिनेत्री

लिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतीच दिल्लीला गेली होती. तिचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी ती रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत गेली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 डिसेंबर-   बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नुकतीच दिल्लीला गेली होती. तिचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी ती रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत गेली होती. ती चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचली होती. त्यावेळी कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याचा (Alia Bhatt Broke Covid Rule) आरोप तिच्यावर लागला होता. आलियाने चित्रपट निर्माता करण जोहरच्या पार्टीला (Karan Johar Party) हजेरी लावली होती. या पार्टीत सहभागी झालेलय चौघी महीप कपूर, सीमा खान, करीना कपूर खान आणि अमृता अरोरा ह्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. यानंतर बीएमसीने आलियाला क्वारंटाईनमध्ये राहण्याची सूचना केली होती.

आलिया भट्टने कोविड नियम मोडले आणि सूचनांचे पालन न करता ती दिल्लीत आली. दिल्लीत आल्यानंतर ती प्रथम गुरुद्वारा बांगला साहिब येथे पोहोचली. यानंतर ती 'ब्रह्मास्त्र'च्या पोस्टर लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली. आता बीएमसी आलियाच्या या वर्तनाबद्दल महामारी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची तयारी करत आहे. आलियाने होम क्वारंटाईनचे नियम मोडले आहेत. आणि म्हणूनच बीएमसीने तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

करीना कपूर खान, महीप कपूर, सीमा खान आणि अमृता अरोरा यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आलिया भट्टनेही तिची कोरोना चाचणी करून घेतली होती. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र तिला १४ दिवस घरी राहण्याचे आदेश बीएमसीने दिले होते. असं असतानाही ब्रह्मास्त्रचे मोशन पोस्टर लाँच करण्यासाठी ती चार्टर्ड विमानाने दिल्लीला पोहोचली होती.

(हे वाचा:Exclusive: जॅकलिन, नोरासह आणखी 10 अभिनेत्री सुकेश चंद्रशेखरच्या संपर्कात )

बीएमसी या प्रकरणाचा तपास करत आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याची पडताळणी झाल्यानंतरच आलियाविरुद्ध एफआयआर नोंदवला जाईल. दैनिक भास्करच्या बातमीनुसार, बीएमसी सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष राजुल पटेल म्यांनी म्हटलं आहे, “मी आरोग्य विभागाला आलिया भट्टविरुद्ध होम आयसोलेशन नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला आहे. ती एक रोल मॉडेल आहे. त्यामुळे तिने जबाबदारीने वागायला हवे होते. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत." असं त्यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Entertainment