मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दबंग सलमान खानच्या कुटुंबाला BMC चा दणका; तिघांविरोधात FIR दाखल

दबंग सलमान खानच्या कुटुंबाला BMC चा दणका; तिघांविरोधात FIR दाखल

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं सलमान खानच्या (salman khan) कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे.

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं सलमान खानच्या (salman khan) कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे.

कोरोना नियमांचं उल्लंघन करणं सलमान खानच्या (salman khan) कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 04 जानेवारी :  बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या (Salman khan) कुटुंबाला मुंबई महापालिकेनं (BMC) दणका दिला आहे. सलमानच्या कुटुंबातील तिघांविरोधात बीएमसीनं FIR दाखल केला आहे. सोहेल खान (sohail khan), अरबाज खान (arbaaz khan) आणि निर्वाण खान (nirvaan khan) यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात महापालिका प्रशासनानं पाऊल उचललं आहे.

यूकेत नवा कोरोना आढळल्यानंतर भारतानं कोरोनासंबंधित नियम अधिक सक्त केले आहेत. विमानतळावर सर्वांची तपासणीही केली जाते आहे. परदेशातून आलेल्या प्रत्येकाला क्वारंटाइन होणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हाच नियम मुंबई महापालिकेनंही लागू केला आहे. त्यानुसार परदेशाहून मुंबईत परतलेल्या प्रत्येकाला क्वारंटाइन राहणं बंधनकारक आहे. असं असताना सलमानचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान, अरबाज खान आणि पुतण्या निर्वाण खान यांनी मात्र या नियमांचं उल्लंघन केलं.

हे वाचा -  अखेर महाराष्ट्रापर्यंत पोहोचला नवा कोरोना; ब्रिटनमधून आलेल्या 8 जणांमध्ये लक्षणं

25 डिसेंबरला तिघंही यूएईहून मुंबईत आले. मुंबई विमानतळावर ते उतरले. त्यांना 7 दिवस क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आलं. तेव्हा त्यांनी आपलं बुकिंग ताज लँड्समध्ये असल्याचं सांगितलं. पण तिघंही परस्पर घरी निघून गेल्याचं उघडकीस आलं. त्यांचा हा बेजबाबदारपणा त्यांना चांगलाच भोवला आहे. त्यांनी क्वारंटाइनचा नियम मोडल्यानं साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत महापालिकेकडून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खार पोलीस ठाण्यात या एफआयआरची नोंद आहे.

हे वाचा - सावधान! राज्यात मृत्यूचा आकडा कमी परंतू मृत्यूदर अद्याप 2 टक्क्यांहून जास्त

यूकेत आढळलेल्या कोरोनाचे रुग्ण भारताही आढळून आले आहेत. हा कोरोना महाराष्ट्रापर्यंतही पोहोचला आहे. राज्यात  8 प्रवाशांमध्ये ही नव्या विषाणूची लक्षणं दिसली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नव्या विषाणूची लक्षणं दिसलेल्या 8 पैकी 5 मुंबईत आहेत, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मध्ये प्रत्येकी एकेक जण आहे. या सर्व रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि आता ते ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले, त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

First published:

Tags: Bollywood, Coronavirus, Mumbai