शिमला, 9 सप्टेंबर : हिमाचलची कन्या, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranuat) आणि महाराष्ट्र सरकारमधील शिवसेना (Shiv Sena) नेता संजय राउत यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात मुंबईत बीएमसीने (BMC Mumbai) कंगना रणौतच्या कार्यालयाच्या एका भागाची तोडफोड केली. बीएमसीने मंगळवारी बेकायदेशीर बांधकामाचं नोटीस पाठवलं होतं.
यानंतर बुधवारी सकाळी पालिकेची टीम कंगनाच्या मुंबईतील कार्यालयात हजर होती. यावेळी त्यांनी सकाळी तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी 100 कामगार हजर असल्याचे सांगितले जात आहे.
कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालय तोडल्याच्या विरोधात ट्विटरवर लोकांनी हिमाचलच्या शिमला येथील काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi House in Shimla) यांचे घर तोडण्याची मागणी सुरू आहे. एका यूजरने ट्वीट करीत लिहिलं आहे की, शिमलामध्ये काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचं बेकायदेशीर घर आहे, हेदेखील तोडायला हवं. या पोस्टवर युजर्सनी मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांना टॅग केलं आहे. आणि लिहिलं आहे की - शिमलामध्ये काँग्रेस नेता प्रियांका गांधी यांचं घरदेखील बेकायदेशीर आहे. हेदेखील तोडायला हवं. प्रियाका गांधी यांनी येथे शानदार घर तयार केलं आहे, मात्र याला जमीन कशी मिळाली माहित नाही. एक महिला यूजरने लिहिलं आहेकी, हिमाचल सरकारलाही हिमाचलमध्ये प्रियांका गांधीचं घर तोडायला हवं.
शिमलातील छराबड़ामध्ये प्रियांका यांचं भलमोठं घर आहे. प्रियाका गांधी यांचं घर शिमलापासून 13 किलोमीटर दूर आणि समुद्रतळापासून 8 हजार फूट उंचीवर आहे. हे घर पहाडी शैलीत तयार करण्यात आलं आहे. इंटीरियरमध्ये देवदारच्या लाकडांनी सजावट केली आहे. घराच्या चहूबाजूंनी हिरवळ आणि पाइनची सुंदर झाडं आहेत. समोर हिमालयाची डोंगररांगा दिसतात. छराबडा हे एक पर्यटन स्थळ आहे.