काळवीटाचं भूत काही जाईना, सैफ- तब्बू आणि सोनाली बेंद्रे पुन्हा अडकले

काळवीटाचं भूत काही जाईना, सैफ- तब्बू आणि सोनाली बेंद्रे पुन्हा अडकले

याआधी या प्रकरणी सीजीएम कोर्टात सर्व आरोपींची सुटका करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता.

  • Share this:

जोधपुर, 20 मे- काळवीट शिकार प्रकरणी  राजस्थान हायकोर्टाने पुन्हा एकदा बॉलिवूड स्टार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू नीलम आणि दुष्यंत सिंह यांना नोटीस जारी केली आहे. राज्य सरकारच्या अपीलवर हायकोर्टाने ही नोटीस पाठवली असून, जस्टिट मनोज गर्ग यांच्या मार्फत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आठ आठवड्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल. याआधी या प्रकरणी सीजीएम कोर्टात सर्व आरोपींची सुटका करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता.

या प्रकरणी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जोधपुरच्या सीजीएम कोर्टाने काळवीटची शिकार केल्याबद्दल सैफ अली खान, नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण सीजीएमचा हा निर्णय राज्य सरकारला मान्य नव्हता. अखेर राज्य सरकारने हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला.

याप्रकरणी कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र सलमानला हायकोर्टातून लगेच जामीन मिळाला होता. कोर्टाने सलमानला जामीन देण्यासोबतच भारत सोडून जाण्यापूर्वी प्रत्येकवेळी कोर्टाची संमती घेण्याचे आदेश दिले होते.

२१ वर्ष जुनं हे प्रकरण नक्की आहे तरी काय?

वर्ष १९९८ मध्ये हम साथ साथ है या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान राजस्थानमध्ये २ ऑक्टोबरला सलमान खानवर दोन काळविटांची शिकार करण्याचा आरोप करण्यात आला. सलमानसोबत नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम आणि सैफ अली खान यांच्यावर सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहित करण्याचा आरोप लावण्यात आला.

या शिकारीशी निगडीत चार गुन्हे नोंदवण्यात आले. यात पहिला भवड येथे चिंकाऱ्याची शिकार, घोडा फार्म येथे शिकार. आर्म्स अक्ट आणि चौथा गुन्हा काळवीटची शिकार प्रकरण आहे. सलमानवर ज्या बंदुकीने काळवीटाची शिकार केली त्या बंदुकीचे लायसन्सची वैध्यताही संपली होती.

VIDEO: मतदानासाठी जाताना किरण खेर अडखळून पडल्या

First published: May 20, 2019, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading