भाजपच्या राज्यसभा खासदारकीच्या ऑफरला माधुरीचा रामराम !

भाजपच्या राज्यसभा खासदारकीच्या ऑफरला माधुरीचा रामराम !

भाजपकडून राज्यसभेची खासदारकी देण्याची ऑफर मिळाली असल्याची कबुली धक धक गर्ल माधुरी दीक्षितने दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून : भाजपकडून राज्यसभेची खासदारकी देण्याची ऑफर मिळाली असल्याची कबुली धक धक गर्ल माधुरी दीक्षितने दिली आहे. मात्र राजकारणात जाण्याचा आपल्याला आजिबात रस नसल्याचं स्पष्टीकरण माधुरीने दिलं आहे. नुकतंच तिच्या बकेट लिस्टच्या यशाबद्दल तीने काही माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना तीने ही बाब स्पष्ट केली आहे.

'बकेट लिस्ट' या पहिल्याच मराठी चित्रपटाचे यश, खूप वर्षांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीला पडद्यवर पाहणारम्य़ा चाहत्यांनी तिच्यावर केलेला प्रेमाचा, कौतुकाचा वर्षांव या सगळ्यात आनंदाने न्हाऊन निघणारी माधुरी दीक्षित सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे.

खुद्द अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिची भेट घेतल्यानंतर तर तिच्या राजकारण प्रवेशाबद्दलच्या चर्चा अधिकच रंगू लागल्या. तिला राज्यसभेची ऑफर दिली गेल्याचेही बोलले जाते आहे.

मात्र या सगळ्याला फारसे महत्व न देता आपल्याला राजकारणात अजिबात रस नसल्याचे तिने स्पष्ट केले. मी कलाकार आहे आणि कलाकारच राहणार, असं ती ठामपणे सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 10:34 AM IST

ताज्या बातम्या