चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!

भाजप- शिवसेनेत भांडण वाढत असल्याने 'नायक' चित्रपटाचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडलाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 03:26 PM IST

चक्क अनिल कपूरला मुख्यमंत्रिपदाची ऑफर, नायकानं दिलं हे उत्तर!

मुंबई 31 ऑक्टोंबर : राज्यात सगळ्यांना वेध लागले ते सत्ता कुणाची आणि मुख्यमंत्री कोण होणार याची. भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली आणि त्यांना बहुमतही मिळालं मात्र सत्तेतल्या वाट्यावरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले असून निकाल लागून सहा दिवस झालेत तरी  अजुन राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. दोन्ही पक्षांमधले मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. नेत्यांच्या वक्तव्यांमुळे हे मतभेद वाढत आहेत. जनतेने कौल देऊनही सरकार स्थापन होत नसल्याने सोशल मीडियावरून आता एक नवा प्रस्ताव लोकांनी मांडलाय. 'नायक' चित्रपटाचा संदर्भ देत नेटकऱ्यांनी अभिनेते अनिल कपूर यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव मांडलाय. सोशल मीडियावर हा प्रस्ताव व्हायरल होत असून लोक राजकीय पक्षांना टोले हाणत आहेत.

दीपिका पदुकोण ते सनी लिओनी, 'ही' आहेत तुमच्या लाडक्या स्टार्सच्या भीतीची कारणं

2001मध्ये अनिल कपूर यांचा 'नायक' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रचलित व्यवस्थेला आव्हान देत अनिल कपूर धडाकेबाज कामगिरी करतो आणि एक दिवसांचा मुख्यमंत्री बनतो. राणी मुखर्जी, परेश रावल, अमरीश पुरी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. पत्रकार असलेला अनिल कपूर हा सत्तेला आव्हान देत आपला दरारा निर्माण करतो. व्यवस्था बदलण्यासाठी मुख्यमंत्री अनिल कपूरला एक दिवसासाठी मुख्यमंत्री बनवतात आणि अनिल कपूर राज्याची घडी निट बसतो अशी या चित्रपटाची स्टोरी आहे.

बूट पॉलिश करणाऱ्या मुलाला Indian Idolमध्ये पाहून आनंद महिंद्रा भावुक, म्हणाले...

Loading...

राज्यातलं सत्तेचं भांडण पाहून लोकांना अनिल कपूरच्या 18 वर्षांपूर्वीच्या त्या चित्रपटाची आठवण झाली. त्यामुळे सोशल मीडियावरून त्याबद्दल लोकांनी लिहायला सुरूवात केलीय. भाजप-सेनेतलं  भांडण मिटेपर्यंत अनिल कपूर यांनाच मुख्यमंत्री करा असं अनेकांनी सुचवलं. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चेत खुद्द अनिल कपूरही सहभागी झालेत. एका युझरला अनिल कपूर यांनी उत्तर देत मी 'नायक'च ठिक आहे असं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...