मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /भाजपला मोठा धक्का, खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू तर दुसऱ्या खासदाराचा कोव्हिडी रिपोर्ट पॉझिटिव्ह

भाजपला मोठा धक्का, खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू तर दुसऱ्या खासदाराचा कोव्हिडी रिपोर्ट पॉझिटिव्ह

हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.

मुंबई, 02 डिसेंबर : बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. सनी देओल गेल्या काही दिवसांपासून कुल्लूमध्ये राहत होते. कुल्लूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईला जाण्यासाठी नियोजन करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

सनी देओल यांच्यावर मुंबईत काही दिवसांपूर्वी खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर ते आपल्या मनातील कुल्लूमधील फार्महाऊसवर राहायला गेले होते. सध्या सनी देओल यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, गुजरातचे भाजपचे राज्यसभेचे खासदार अभय भारद्वाज यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. भाजप खासदार भारद्वाज यांचं मंगळवारी चेन्नईमध्ये निधन झालं. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिक खालवली. अभय भारद्वाज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला.

हे वाचा-भारतात आणखी 3 CORONA VACCINE चं क्लिनिकल ट्रायल; PM मोदींनी घेतला आढावा

खासदार अभय भारद्वाज यांचा 31 ऑगस्टला कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर राजकोटच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अधिक खालवल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी चेन्नईला दाखल करण्यात आलं. अभय भारद्वाज यांच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट्स देखील कोरोना पॉझिटिव्ह आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

राजस्थानच्या आमदार किरण माहेश्वरी यांची महिन्याभरापासून कोरोनाविरुद्धची असलेली झुंज 30 नोव्हेंबरला अपयशी ठरली असून त्यांचं निधन झालं. याआधीदेखील कोरोनानं अनेक बड्या नेत्यांचं निधन झालं आहे.

First published:

Tags: BJP, Sunny deol