मुंबई, 01 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या लालसिंह चढ्ढा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये या सिनेमाचं शूट चालू आहे. आमिरचे अनेक फॅन्स शूटिंगदरम्यान त्याला भेटण्यासाठी येत असतात. अशातच आमिरच्या शूटिंगबद्दल एका भाजप आमदाराने सवाल उपस्थित केला आहे. नंदकिशोर गुर्जर असं या आमदाराचं नाव आहे.
काय घडला प्रकार?
आमिर खानच्या फिल्मचं शूटिंग सुरू असताना काही चाहते आमिरला भेटण्यासाठी सेटवर आले. आमिर खानही त्यांना भेटला. पण त्याने मास्क लावला नव्हता. किंवा त्याच्या तोंडावर फेस कव्हरही नव्हतं. कोरोना काळात घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. हा नियम आमिर खानने मोडला. असा आरोप भाजप नेते नंदकिशोर गुर्जर यांनी केला आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आमिरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. आता या तक्रारीनंतर आमिर खानवर काही कारवाई केली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लालसिंह चढ्ढा या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमिर खान जखमी झाल्याची माहिती आहे. एक अॅक्शन सीन शूट करत असताना तो जखमी झाला. तरीही त्याने काम अर्धवट सोडलं नाही. जखमी अवस्थेतही त्याने ठरलेलं शूटिंग पूर्ण केलं. या सिनेमात आमिर खान करिना कपूरसोबत काम करत आहे. पुढच्या वर्षीच्या नाताळपर्यंत हा सिनेमा रीलिज होण्याची शक्यता आहे. आमिरच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमातला आमिरचा लूक खूपच वेगळा आहे. त्याच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Bollywood