Home /News /entertainment /

कोण आहे मानेंचा बोलवता धनी? Kiran Mane यांच्या वादात आता चित्रा वाघ यांची उडी

कोण आहे मानेंचा बोलवता धनी? Kiran Mane यांच्या वादात आता चित्रा वाघ यांची उडी

bjp leader chitra wagh

bjp leader chitra wagh

भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनीही किरण माने यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे.

    मुंबई, 17 जानेवारी: गेल्या काही दिवसांपासून किरण माने (Kiran Mane) यांचं नाव सगळीकडे चर्चेत आहे. राजकीय भूमिका मांडल्यानं त्यांना मालिकेतून काढल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र महिला कलाकारांसोबत गैरवर्तणूक केल्यानं त्यांना 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतून डच्चू देण्यात आल्याचं स्टार प्रवाह वाहिनीनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता राज्यातील अनेक नेते आपली भूमिका मांडत आहेत. त्यामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी उडी घेतली आहे. चित्रा वाघ यांनी किरण माने यांच्यावर कठोर शब्दात टीका करत हल्लबोल केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत, किरण माने यांच्यावर हल्लबोल केला आहे. त्या म्हणाल्या, "मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी किरण मानेनी गैरवर्तन केलं. म्हणून त्याला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलं. त्यानंतर मानेनं नवं नाट्य उभं केलं". "महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendera Modi) यांच्यावर विखारी टीका करणाऱ्या किरण मानेला सत्ताधारी पाठीशी घालत आहे", असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. ‘किरण मानेंचा बोलवता धनी कोण?’, असा सवाल उपस्थित करत ‘या सोंगाड्यावर कारवाई करा, त्याला शिक्षा झालीच पाहिजे', असं म्हटलं आहे. चित्रा वाघ यांच्यापूर्वी, इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीदेखील किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आल्याचं म्हटलं आहे. किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. किरण मानेंनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या स्पष्टीकरणानंतर सहकलाकारांना विचारलं असता, त्यांनी किरण मानेंवरच गंभीर आरोप केले. मालिकेतील मुख्य कलाकार दिव्या पुगावकरनं किरण मानेंवर आरोप करताना माने हे सतत टोमणे मारायचे आणि अपशब्द वापारायचे, असा आरोप केला. तर किरण माने सेटवर चांगले वागत नसत, असं काही सहकलाकारांचं म्हणणं आहे. काही सहकलाकारांनी किरण मानेंना पाठिंबा दिला आहे. किरण माने ही एक चांगली व्यक्ती आहे. त्यांनी आमच्यापैकी कुणाशीही गैरवर्तन केलेलं नाही. सहकलाकार म्हणून ते नेहमीच पाठीशी उभे राहतात. त्यांनी आतापर्यंत माझ्यासमोर कधीच शिवी दिलेली नाही. कधीच घाणेरड्या भाषेत ते बोललेले नाहीत. व्यक्ती म्हणून ते दिलदार आहेत, अशी प्रतिक्रिया देत एका महिला सहकलाकाराने पाठिंबा दिला आहे.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: BJP, Chitra wagh

    पुढील बातम्या