Home /News /entertainment /

HBD Ankita Lokhande: त्या एका कारणामुळे तुटलं अंकिता आणि सुशांतचं पवित्र नातं

HBD Ankita Lokhande: त्या एका कारणामुळे तुटलं अंकिता आणि सुशांतचं पवित्र नातं

6 वर्ष एकत्र राहिल्यानंतर अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्यातलं पवित्र नातं तुटलं.

    मुंबई, 19 डिसेंबर: टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)  नेहमीच चर्चेत असते. अंकिताचं सुरुवातीपासूनच जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे. पवित्र रिश्ता (Pavitra Rishta) या मालिकेत दमदार भूमिका केल्यानंतर अंकिता लोखंडेने मोठ्या पडद्यावरही धमाकेदार एन्ट्री घेतली होती. कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) मणिकर्णिका या चित्रपटात तिने महत्वाची भूमिका साकारली होती. याच हरहुन्नरी अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. अंकिताचा जन्म 19 डिसेंबर 1984 रोजी मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये झाला होता. अंकिताला सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीत येण्याची आवड होती, कठोर परिश्रम आणि जिद्दीने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. अंकिता सर्वात जास्त चर्चेत येते ती त्याच्या आणि सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) नात्यामुळे. त्या दोघांची जोडी चाहत्यांना रिअल लाइफमध्येही आवडायची. मालिका सुरू असतानाच त्यांच्या प्रेमाबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यांचं लग्न होणाऱ्या असल्याच्या चर्चांनाही 2016 मध्ये उधाण आलं होतं. पण काही वर्षांनी ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. जवळजवळ सहा वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केलं. सुशांतला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करायचं होतं आणि एकमेकांना समजून घेण्यात आम्ही दोघं कुठेतरी कमी पडत आहोत असं कारण देत त्यांनी ब्रेकअप केलं. ते दोघं वेगळे झाल्याचा धक्का त्यांच्या फॅन्सनाही बसला. अंकिता तर ब्रेकअपनंतर अनेक महिने डिप्रेशनमध्येही होती पण शेवटी तिने स्वत:ला सावरलं आणि ती तिच्या पायावर पुन्हा एकदा उभी राहिली. दरम्यान अंकिता लोखंडेच्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रमैत्रिणींना रात्री 12 वाजताचा तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला आहे. वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडीओ अंकिताने शेअर केले आहेत. यावेळी विकी जैनही उपस्थित होता.
    अंकिता आणि सुशांत वेगळे झाल्यानंतर काही वर्षांनी तिने विकी जैनसोबत नातं जोडलं. ते लवकरच लग्नगाठ बंधणार आहेत. अंकिताने मणिकर्णिका, बागी 3 अशा चित्रपटातही काम केलं आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    पुढील बातम्या