मुंबई, 23 मार्च : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा वाढदिवस. कंगना आणि वाद यांचं आता एक समीकरणच झालं आहे. पण कंगना तिच्या स्पष्ट स्वभावासाठीही ओळखली जाते. ती कोणतीही गोष्ट बोलताना मागे पुढे पाहत नाही. मागच्या वर्षी तिनं एका मुलाखतीत पहलाज निहलानी यांच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. पहलाज यांनी तिला एका सिनेमासाठी अश्लिल फोटोशूट करायला सांगितलं होतं असं कंगाना म्हणाली. यावेळी कंगना फक्त या फोटोशूटबद्दलच बोलली नाही तर पहलाज यांनी कशाप्रकारे ‘सॉफ्ट पॉर्न’ करण्यासाठी तिला सांगितलं याचा किस्साही सांगितला.
कंगना सिनेसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना तिच्यासोबत हा किस्सा झाल्याचं कंगनाने स्पष्ट केलं. कंगना म्हणाली की, ऑफर केलेल्या सिनेमात तिला अंर्तवस्त्रांशिवाय कपडे घालण्यास सांगण्यात आले होते. या घटनेबद्दल बोलताना कंगना म्हणाला की, ‘त्यावेळी मला कळलं की माझे आई- वडील सिनेमात मला का पाठवत नव्हते. करिअरच्या सुरुवातीला तिला एक सिनेमाची ऑफर देण्यात आली होती. या सिनेमाचं नाव होतं, ‘लव्ह यू बॉस’ या सिनेमात एका मुलीचे आपल्या बॉसवर प्रेम असते असं दाखवण्यात आलं होतं.’
हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र यांनी बुक केलं पूर्ण हॉस्पिटल, कारण वाचून व्हाल हैराण
या सिनेमासाठी कंगनाला एक फोटोशूट करावं लागणार होतं. यासाठी पहलाज यांनी तिला एक ड्रेस घालायला सांगितला. हा ड्रेस अंतर्वस्त्रांशिवाय घालायला तिला सांगण्यात आले. तो ड्रेस गुडघ्यापर्यंतचा होता आणि सॅटीन मटेरियलचा तो ड्रेस होता.
Corona Positive कनिकाचे हॉस्पिटलमध्येही ‘नखरे’, डॉक्टर्सची डोकेदुखी वाढली
कंगना स्वतः म्हणाली की तो सिनेमा सॉफ्ट पॉर्न प्रकारातला होता. याच कारणामुळे तिचे आई- वडील सिनेसृष्टीत तिला पाठवायला नकार द्यायचे असं ती म्हणाली. कंगना या फोटोशूटच्या मधूनच पळून गेली आणि तिने स्वतःचा फोन नंबरही बदलला. एवढं सगळं होऊनही कंगनाने स्वतःवरचा आत्मविश्वास गमावला नाही आणि ती ऑडिशन्स देत राहिली. याच सिनेमानंतर कंगनाला अनुराग बासुचा 'गँगस्टर' आणि जगन्नाथ यांचा 'पोकिरी' सिनेमा मिळाला. या सिनेमांनंतर तिने कधीही मागे फिरून पाहिलं नाही.
Coronavirus बाबत निष्काळजीपणावर भाईजानची सटकली, Video मधून व्यक्त केला राग मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.