Home /News /entertainment /

Birthday Special: वाढदिवशी अक्षय कुमारचे चाहत्यांना खास गिफ्ट, 'बेलबॉटम'मधील लुक रिव्हील

Birthday Special: वाढदिवशी अक्षय कुमारचे चाहत्यांना खास गिफ्ट, 'बेलबॉटम'मधील लुक रिव्हील

आज 9 सप्टेंबर रोजी अक्षय कुमारचा वाढदिवस असून 'बेलबॉटम'च्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील अक्षय कुमारचा नवीन लूक असलेला फोटो रिव्हिल केला आहे.

    मुंबई, 09 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात (Coronavirus) सगळेच व्यवहार ठप्प झाले होते. त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील चित्रपटांचे शूटिंग  देखील थांबले होते. मात्र आता सरकाने चित्रीकरणाला परवानगी दिल्यानंतर अनेक चित्रपटांना सुरुवात झाली आहे. अनेक अभिनेत्यांनी आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) याने देखील आपल्या 'बेलबॉटम' (Bellbottom) या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. आज 9 सप्टेंबर रोजी अक्षय कुमारचा वाढदिवस असून 'बेलबॉटम'च्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील अक्षय कुमारचा नवीन लूक असलेला फोटो रिव्हिल केला आहे. अक्षय कुमारचा हा लुक रिव्हिल करून त्याच्या चाहत्यांना देखील खुश करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे. (हे वाचा-एकता कपूरने मागितली माफी, अहिल्याबाईंचे नाव वापरून भावना दुखावल्याचा आरोप) या फोटोमध्ये अक्षय कुमार रेट्रो लूक मध्ये दिसून येत असून गॉगल घालून विमानाला टेकून उभा आहे. हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी याने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले कि, "THROWBACK TO THE 80S! THE SUAVE RETRO LOOK OF AKSHAY KUMAR." अक्षय कुमार या चित्रपटात  गुप्तहेराची भूमिका निभावत असून यामध्ये तो विमानातील 212 प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार आहे. चित्रपटाचे शूटिंग सध्या स्कॉटलंडमध्ये सुरु असून अक्षय कुमार याच्याबरोबर लारा दत्ता, वाणी कपूर, आदिल हुसेन, हुमा कुरेशी देखील दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी करत असून दीपशिखा देशमुख आणि जॅकी भगनानी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. (हे वाचा-कंगनाच्या मुंबईतील ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तळ मजल्यावर तोडकाम सुरू) या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना जॅकी भगनानी याने मुंबई मिररला सांगितले कि, हा सिनेमा एक थ्रिलर असून याचे चित्रीकरण स्कॉटलंडमध्ये सुरू आहे. 80 च्या दशकातील विमान अपहरणासंबंधी या चित्रपटाची कथा असून 10 सप्टेंबर पर्यंत याचे शूटिंग पूर्ण होईल. त्याचबरोबर सर्व शूटिंग ओरिजिनल ठिकाणी होत असून यासाठी कोणत्याही प्रकारचा सेट उभारण्यात आलेला नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Akshay Kumar, Bollywood

    पुढील बातम्या