बर्थडे स्पेशल - दिलीप कुमार आधी विकत होते सँडविच!

पुण्यात त्यांची एका पारशी कॅफे मालकाशी ओळख झाली आणि त्यांना कॅन्टीन चालण्याचं कंत्राट मिळालं. यानंतर चांगल्या इंग्रजीमुळे आणि शिक्षणाच्या जोरावर कुमार साहेबांनी नोकरी मिळवली आणि एक सँडविच स्टॉल सुरू केलं. याच स्टॉलवर त्यांनी पाच हजार रुपयांची कमाई केली आणि मुंबईला आपल्या घरी वडिलांना मदत करायला सुरुवात केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 11, 2017 02:09 PM IST

बर्थडे स्पेशल - दिलीप कुमार आधी विकत होते सँडविच!

11 डिसेंबर : हिंदी सिनेमाचे 'ट्रॅजेडी किंग' म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 95वा वाढदिवस आहे. भारतात दादासाहेब फाळके पुरस्कार तर पाकिस्तानात निशान-ए-इम्तियाज या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मान केलाय. दिलीप साहेब सध्या अनेक आजारांमुळे चर्चेत असतात. पण त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर आजच्या या खास दिवशी एक नजर टाकूयात.

हिंदी सिनेमावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रत्येक पिढीवर जादू करणाऱ्या दिलीप कुमार यांचं नाव मुहम्मद यूसुफ खान होतं. त्यांचा जन्म पेशावर (पाकिस्तान)मध्ये 11 डिसेंबर 1922 मध्ये झाला. 1930ला त्यांचं कुटुंब पेशावरहून मुंबईला आलं. त्यांच्यासह त्यांना एकूण 12 बहीण-भाऊ होते. एवढा मोठा परिवार सांभाळण्यासाठी त्यांचे वडील फळं विकायचे. दिलीप कुमार यांनी नाशिकच्या बार्नेस शाळेत आपलं शिक्षण घेतलं. वडिलांशी असलेल्या मतभेदामुळे ते घर सोडून पुण्याला गेले.

पुण्यात त्यांची एका पारशी कॅफे मालकाशी ओळख झाली आणि त्यांना कॅन्टीन चालण्याचं कंत्राट मिळालं. यानंतर चांगल्या इंग्रजीमुळे आणि शिक्षणाच्या जोरावर कुमार साहेबांनी नोकरी मिळवली आणि एक सँडविच स्टॉल सुरू केलं. याच स्टॉलवर त्यांनी पाच हजार रुपयांची कमाई केली आणि मुंबईला आपल्या घरी वडिलांना मदत करायला सुरुवात केली.

यानंतर अनेक संघर्षाने त्यांनी या सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि त्यांच्या उत्तम कामगिरीमुळे ते नेहमीच चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाले आणि आता ते त्यांचा 95वा वाढदिवस साजरा करत आहेत.

 

Loading...

दिलीप कुमार आधी विकत होते सँडविच!

दिलीप कुमार आधी विकत होते सँडविच!

पण गेले काही दिवस दिलीप साहेब न्युमोनियाने आजारी होते, त्यामुळे यंदा त्यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करणार असल्याचं त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी स्पष्ट केलंय. असं असलं तरीही यानिमित्त घरात त्यांची आवडती बिर्याणी आणि व्हॅनिला आईस्क्रिमचा बेत करणार असल्याचं सायराजींनी सांगितलंय. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दिलीप साहेबांना या दोन्ही गोष्टी देणार असल्याचंही त्या म्हणाल्या. संध्याकाळी त्यांच्या भेटीसाठी बॉलिवूड स्टार्स आवर्जून हजेरी लावतात. तेव्हा मात्र सगळ्यांसोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत.

दिलीप कुमाराच्या 95व्या वाढदिवसानिमित्त न्यूज 18 लोकमतच्याही त्यांना खूप खूप शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2017 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...