'थ्री इडियट्स' फेम अभिनेता पडला स्वतःच्याच स्टुडंटच्या प्रेमात, पुढे झालं असं काही की...

'थ्री इडियट्स' फेम अभिनेता पडला स्वतःच्याच स्टुडंटच्या प्रेमात, पुढे झालं असं काही की...

बॉलिवूडमध्ये अनेकांना त्याच्यासोबत काम करणाऱ्या को-स्टारवर जीव जडल्याची आणि विवाह बंधनात अडकल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण हा अभिनेता चक्क त्याच्या विद्यार्थीनीच्याच प्रेमात पडला...

  • Share this:

मुंबई, 1 जून : बॉलिवूडमध्ये रोमँटिक कपल्सची अजिबात कमी नाही. शाहरुख-गौरी, रणवीर-दीपिका, प्रियांका-निक अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची लव्हस्टोरी एकदम हटके आणि कूल आहे. बॉलिवूडमध्ये अनेकांना त्याच्यासोबत काम करणाऱ्या को-स्टारवर जीव जडल्याची आणि विवाह बंधनात अडकल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण यात एका अभिनेत्याची लव्हस्टोरी मात्र सर्वात आगळीवेगळी आहे. या अभिनेत्याला चक्क त्याच्या विद्यार्थीनीवरच जीव जडला होता. हा अभिनेता आहे आर माधवन. आज त्याचा 50 वा वाढदिवस. त्यानिमित्तानं जाणून घेऊया त्याच्या हटके लव्हस्टोरी बद्दल...

माधवन आणि त्याची बायको सरिताची लव्हस्टोरी इतरांसारखी अजिबात नाही ती थोडीशी हटके आणि खूप इंटरेस्टिंग आहे. माधवनचे वडील टाटा स्टीलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्यूटिव्ह होते तर आई सरोज बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होती. अभ्यासात हुशार असलेल्या माधवननं त्यासोबत अनेक छंदही जोपासले होते. त्याला आर्मीमध्ये प्रवेश घ्यायचा होता मात्र त्याच्या पालकांनी त्याला मॅनेजमेंट स्टीडी करण्याचं सुचवलं. इलेक्ट्रॉनिकची डिग्री घेतल्यानंतर माधवननं कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पिकिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली. याच क्लासमध्ये माधवन आणि सरिताची भेट झाली.

कोरोना आणि किडनीच्या आजारानं प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं निधन

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

1991मध्ये सरिता एअरहोस्टेसच्या नोकरीची तयारी करत होती. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लाससाठी ती त्यावेळी महाराष्ट्रात आली होती. सरिताची माधवनच्या क्लासमध्ये निवड झाली. त्यानंतर तिनं त्याला पर्सनली भेटून माधवनचे आभार मानले आणि सोबतच तिनं त्याला डिनरसाठी बोलवलं.

 

View this post on Instagram

 

Wish you all a very happy Valentine’s Day folks .

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

आपल्या पहिल्या डेटबद्दल माधवन सांगतो, 'सरिता माझी स्टूडंट होती आणि तिनं मला डिनर डेटसाठी विचारलं. माझ्यासाठी ही चांगली संधी होती. मी तिला त्याचवेळी प्रपोज केलं आणि नंतर तिच्याशी लग्न केलं.' माधवन आणि सरितानं जवळपास 8 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 1999मध्ये लग्न केलं. त्यांचं लग्न तमिळ पद्धतीनं झालं. या दोघांना आता वेदांत नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

श्रीदेवींनी वयाच्या पन्नाशीत केलं होतं BOLD फोटोशूट, रातोरात झाले Photo Viral

रिअल हिरो सोनू सूद आहे कोट्यावधींच्या संपत्तीचा मालक, जगतो रॉयल लाइफस्टाइल

First published: June 1, 2020, 8:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading