वाढदिवसानिमित्त आराध्याने गायलं भजन; बिग बींच्या नातीचा VIDEO एकदा पाहाच !
आराध्या बच्चनचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिचा एक भजन म्हणतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जय सिया राम हे भजन आराध्याच्या तोंडून ऐकताना अधिकच श्रवणीय वाटत आहे. एकदा तुम्हीही पाहाच हा व्हिडीओ
मुंबई, 16 नोव्हेंबर: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या मुलीचा 9वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने आराध्याचा एक भजन म्हणताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आराध्या 'राम सिया राम' हे भजन म्हणत त्यावर डान्स करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर अनेक फॅन्सनी आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आराध्याचा भजन म्हणतानाचा व्हिडीओ बच्चन कुटुंबाच्या एका चाहत्याने शेअर केला आहे. आराध्याचा हा व्हिडीओ म्हणजे चाहत्यांसाठी छान ट्रीट आहे. चाहत्याने व्हिडीओ शेअर करत कॅप्शन दिलं आहे की, ‘मला असं वाटतं की आराध्याचा व्हिडीओ शेअर करण्याची ही योग्य वेळ आहे. तिचा वाढदिवस आहे आणि दिवाळीचं निमित्तही आहे.’ असं म्हणत त्याने हॅपी बर्थडे आराध्या अशा शुभेच्छाही दिल्या आहेत.
I guess now’s the best time to share this video of Aaradhya singing a devotional song for Diwali.
या व्हिडीओमध्ये आराध्याने गुलाबी रंगाचा शरारा घातला आहे. भजन म्हणताना ती अतिशय गोड दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ अनेक चाहत्यांना आवडत आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत 14 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.
आजोबांकडून स्पेशल गिफ्ट
अमिताभ बच्चन यांनीही आपल्या नातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमितजींनी आराध्याच्या फोटोंचा एक कोलाज् बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या कोलाज् मध्ये आराध्याच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतचे सगळे फोटो आहेत.