बर्थडे स्पेशल : रणधीर कपूर यांचा अभिनेता, दिग्दर्शक ते निर्मात्यापर्यंतचा प्रवास

बर्थडे स्पेशल : रणधीर कपूर यांचा अभिनेता, दिग्दर्शक ते निर्मात्यापर्यंतचा प्रवास

आज रणधीर यांचा 71वा वाढदिवस आहे. 15 फेब्रुवारी 1947ला कपूर घराण्यात रणधीर यांचा जन्म झाला आणि सिनेमाचं बाळकडू त्यांना जणू तेव्हाच मिळालं.

  • Share this:

चित्राली चोगले, 15 फेब्रुवारी : रणधीर राज कपूर या नावानं अनेक वर्ष बॉलिवूडला उत्तोत्तम सिनेमे दिले. फक्त एक उत्तम अभिनेता म्हणून नाही तर एक चांगला निर्माता आणि उत्तम दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांच नाव आजही अजरामर आहे. आज रणधीर यांचा 71वा वाढदिवस आहे. 15 फेब्रुवारी 1947ला कपूर घराण्यात रणधीर यांचा जन्म झाला आणि सिनेमाचं बाळकडू त्यांना जणू तेव्हाच मिळालं.

वडिल राज कपूर यांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेमात करिअर करण्याचा निर्णय बहुदा अगदी अजाणत्या वयात त्यांनी घेतला असावा. कारण यांच्या फिल्मी दुनियेची सफर सुरु झाली ते बालकलाकार म्हणून 1955 साली रिलीज झालेल्या 'श्री 420' सिनेमातून. पुढे अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केलं ते 'कल आज और' या सिनेमातून.

सिनेमा तेवढा हिट ठरला नसला तरी रणधीर यांची ओळख बॉलिवूडला नक्कीच झाली. कपूर घराण्यानं अजून एक स्टार रणधीरच्या माध्यमातून इडस्ट्रीला दिला होता. पदार्पणाच्या अगदी पुढच्याच वर्षी म्हणजे 1972ला लगोलग रणधीर यांनी 'जित', 'रामपूरका लक्ष्मण' आणि 'जवानी दिवानी हे' असे 3 सिनेमे केले. याच सिनेमांनी रणधीर यांना अभिनेता म्हणून एक वेगळी ओळख दिली आणि त्यांचा सिनेसृष्टीतला प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला. याच दरम्यान 1971साली वयाच्या 24व्या वर्षी बबीता यांच्याशी ते विवाहबद्ध झाले.

त्यांच्या करिअरची आणि लग्नाची गाडी एकत्रच सुरु झाली. पुढे त्याच वर्षी 'लफंगे' आणि 'पोंगा पंडित' हे सिनेमे ही गाजले. 1976 ते 1981 त्यांचे मल्टीस्टार सिनेमे 'चाचा भतिजा', 'कसमें वादे', 'मामा भांजा', 'हीरालाल पन्नालाल', 'भक्ति में शक्ती', आणि 'बीवी वो बीवी' या सिनेमांनी त्यांना खूपच लोकप्रियात मिळून दिली. पण 1981 साली त्यांचा 'हरजाई' सिनेमा फ्लॉप ठरला आणि तिथून त्यांच्या करिअरला ब्रेक लागला. तो सुद्धा 10 वर्षांचा.

10 वर्षांनी 1991 साली त्यांनी जोरदार कमबॅक केला तो दिग्दर्शक म्हणून 'हिना' सिनेमातून. त्यांचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. खरतर हा सिनेमा रणधीर यांचे वडिल राज कपूर हे दिग्दर्शित करत होते पण त्यांच्या अकस्मित निधनानं हा सिनेमा रणधीर यांच्याकडे आला. त्यांनी त्यांच्या शैलीत तो दिग्दर्शित केला आणि एक सुपरहिट सिनेमा भारताला दिला. या सिनेमाने त्या वर्षी अनेक पुरस्कारांवर मोहर तर उमटवलीच शिवाय त्या वर्षीची भराताची ऑफिशिअल ऑस्कर एन्ट्री ठरला.

पुढे निर्माता-दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम करणं सुरु ठेवलं. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर 1997 साली 'लेडिज ओन्ली' सिनेमातून त्यांच्या अभिनयाची झलक पुन्हा मिळणार असं वाटत असतानाच सिनेमा पूर्ण होऊनही रिलीज झाला नाही. पण 1999ला अखेर त्यांची मोठ्या पडद्यावर पुनरआगमन झालं ते 'मदर' सिनेमातून, त्यानंतर त्यांनी पुन्हा काही कामं केली अगदी एलिकडेच आलेल्या 'हाऊसफुल्ल'मधल्या त्यांच्या धमाल भूमिका तर खुपच भाव खाऊन गेली.

तर कपूर घराण्यातील रणधीर यांनी इंडस्ट्रीला अभिनेता, दिग्दर्शक निर्माता म्हणून उत्तमोत्तम सिनेमे तर दिलेच शिवाय त्यांच्या अभिनयाचा वारसा पुढे चालवणाऱ्या दोन उत्तम अभनेत्री त्यांच्या मुली करिष्मा, करिनाच्या रुपात इंडस्ट्रीला मिळाल्या. रणधीर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

First published: February 15, 2018, 8:01 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading