Home /News /entertainment /

KGF Chapter 2 'या' दिवशी होणार रिलीज! समोर आला रॉकीचा फर्स्ट LOOK

KGF Chapter 2 'या' दिवशी होणार रिलीज! समोर आला रॉकीचा फर्स्ट LOOK

यशने आज आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. आज त्याच्या वाढदिवसादिवशीच KGF 2 चा फर्स्ट पोस्टर रिलीज झाला आहे. शिवाय त्याची रिलीज (KGF 2 Release Date) डेटसुद्धा समोर आली आहे.

    मुंबई, 8 जानेवारी-   साऊथ सुपरस्टार   (South Superstar)  यशचा   (Yash)  आज वाढदिवस आहे. KGF चित्रपटामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्याचे कोट्यवधी चाहते आहेत. आज त्याचे चाहते त्याला सोशल मीडियावरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. परंतु यशनेसुद्धा आज आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. आज त्याच्या वाढदिवसादिवशीच KGF 2  चा फर्स्ट पोस्टर रिलीज झाला आहे. शिवाय त्याची रिलीज   (KGF 2 Release Date)   डेटसुद्धा समोर आली आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्याचा डेंजर लूक (KGF 2 Yash Look)   पाहायला मिळत आहे. यशचा KGF चॅप्टर 1 सुपरडुपर हिट ठरला होता. चाहत्यांना अनेक दिवसांपासून त्याच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागून होती.या चित्रपटाचा दुसरा भाग गेल्यावर्षीच रिलीज होणार होता. परंतु कोरोना संकटामुळे या चित्रपटाची रिलीज डेट सतत पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे चाहते नाराज होते. परंतु आज यशच्या वाढदिवसादिवशीच मेकर्सनी चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. आज KGF 2  चा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये यशचा फर्स्ट लूक पाहायला मिळत आहे. हा चित्रपट 14 एप्रिलला रिलीज होणार आहे. तब्बल 5 भाषांमध्ये हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा पोस्टर रिलीज केला आहे. त्यांनी पोस्टरसोबत ट्विट करत लिहिलं आहे, 'सावधान... समोर धोका आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या रॉकी'.. 2022 मध्ये या राक्षसी जगाला जिंकण्यासाठी प्रतीक्षा नाही करू शकत'. असं लिहीत त्यांना आपली उत्सुकता दाखवून दिली आहे. KGF हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाने जगभरात तुफान कमी केली होती. चित्रपटातील यशच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं होतं. चाहते आतुरतेने त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहात होते. 2021 मध्ये रिलीज होणार हा चित्रपट 2022 मध्ये रिलीज होणार आहे. आता लवकरच चाहत्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. KGF 2 मध्ये यशसोबत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त, रविना टंडन, श्रीनिधी शेट्टी महत्वाच्या भूमिकेत आहेत. शिवाय प्रकाश राज, मालविका, अच्युत कुमार असे अनेक कलाकार आहेत.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, South indian actor

    पुढील बातम्या