19 जानेवारी : अभिनेत्री बिपाशा बासू तिच्या प्रेग्नंसीच्या अफवांमुळे फारच त्रस्त झालीये. अखेरीस बिपाशाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. बिपाशाने मी प्रेग्नंट नसल्याचं अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. करणचं आणि माझं हे खाजगी आयुष्य असून आम्ही योग्य वेळी हा निर्णय घेऊ असं तिने म्हटलंय. एवढंच नव्हे तर माझ्या प्रेग्नंसीच्या अफवा पसरवू नका याचा मला त्रास होतो असंही तिने सांगितलं.
पण ही अफवा पसरली कशी आणि कुणी? त्याचं काय झालं, बिपाशा आणि करण एका दवाखान्यासमोर उभे होते. झालं, लोक सुतावरून स्वर्गात जातातच. त्यात बिपाशानं एका मुलाखतीत म्हटलं होतं, की करणनं मला एक सुंदर गिफ्ट दिलंय. काही दिवसांनी तुम्हाला ते दिसेल..
आता सांगा, अशा मुलाखती दिल्यावर का नाही कुणाला शंका येणार. असो. पण तूर्तास तरी या चर्चेला पूर्णविराम मिळालाय हे खरं.
Amused yet again. I kept a bag on my lap while getting into my car and certain media ppl started my pregnancy speculation again😂Guys i am not pregnant .Kinda getting irritating 😡Stay calm.. it will happen only when we want it🙏
Loading...— Bipasha Basu (@bipsluvurself) January 17, 2018
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा