...म्हणून बिपाशानं कंडोमची जाहिरात केली

बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी केलेली कंडोमची जाहिरात सध्या चांगलीच गाजतीये. खरं तर रिअल लाईफ कपलने केलेली ही पहिलीच कंडोमची जाहिरात असेल.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2017 12:39 PM IST

...म्हणून बिपाशानं कंडोमची जाहिरात केली

30 आॅक्टोबर : बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर यांनी केलेली कंडोमची जाहिरात सध्या चांगलीच गाजतीये. खरं तर रिअल लाईफ कपलने केलेली ही पहिलीच कंडोमची जाहिरात असेल.यावरून बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्या तरीही बिपाशाचा मात्र ही जाहिरात करण्यामागचा विचार वेगळा आहे.

कंडोमची जाहिरात ही कायम काहीसं हातचं राखून करण्यात येते. मात्र बिपाशाने या साऱ्या मर्यादा धुडकावून देत करणसोबत अतिशय बोल्ड अशी कंडोमची जाहिरात शूट केली. सध्या बिपाशा आणि करणची ही जाहिरात बॉलिवूडसह सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलीय. बिपाशा एवढ्यावरच थांबली नाही तर या जाहिरातीनिमित्त केलेलं बोल्ड फोटोशूट तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही शेअर केलं.

अनेकांनी म्हटलं की यांनी एकत्र एन्डॉर्स करायचं एवढं एकच प्रॉडक्ट शिल्लक राहिलंय. तर अनेकांनी बिपाशा आणि करणला बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याने त्यांनी कंडोमची जाहिरात केल्याचीही टीका केली. मात्र बिपाशाने या सगळ्याकडे दुर्लक्ष करूनही आपला निर्णय योग्य असल्याचं सांगितंलय.

या जाहिरातीनंतर सोशल मीडियावर येणाऱ्या उलट सुलट प्रतिक्रिया पाहून बिपाशाने ही जाहिरात करण्यामागची भूमिकाच स्पष्ट केली.

'ज्या देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. तिथे फक्त सेक्स आणि कंडोम या विषयावर बोलणंही चुकीचं समजलं जातं. त्यापेक्षाही पुढे येऊन, याबाबत बोलून आणि माहिती घेऊन काही गोष्टींची काळजी घेतली तर अनेक गोष्टी टाळता येतात. कंडोम वापरून तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करून प्रोटेक्टेड सेक्स करू शकता. त्याशिवाय एचआयव्ही आणि एसटीडीसारख्या त्रासापासून दूर राहू शकता. एक जोडपं म्हणून कंडोमची जाहिरात करण्यामागे माझा आणि करणचा नेमका हाच विचार होता.'

Loading...

बिपाशाच्या या पोस्टनंतर तिच्यावर सोशल मीडियातून तिच्यावर आणि करणवर होणारी टीका थांबली. तर तिच्या या बोल्ड विचारांबद्दल मात्र तिच्या फॅन्सनी तिचं कौतुकचं केलं.बिपाशासारख्या सेलिब्रिटींनी घेतलेल्या या पुढाकारानंतर तरी कंडोमबाबत बोलताना आपलं अवघडलेपण दूर होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...