मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या दत्तक मुलाची आई परतली, मागितला मुलाचा हक्क

धक्कादायक! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या दत्तक मुलाची आई परतली, मागितला मुलाचा हक्क

'वॉर' फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) याच्या आयुष्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.

'वॉर' फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) याच्या आयुष्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.

'वॉर' फेम दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) याच्या आयुष्यात एक खळबळजनक घटना घडली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 10 डिसेंबर: प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) याच्या आयुष्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' सिनेमा गाजल्यानंतर सिद्धार्थ आता 'पठाण'ची तयारी करत आहे. मात्र अशी एक घटना घडली आहे की ज्यामुळे सिद्धार्थच्या आयुष्य हादरलं आहे. सिद्धार्थने गेल्यावर्षी  एक मुलगा दत्तक घेतला होता, मात्र आता मुलासाठी त्याला त्याच्या खऱ्या आईशी न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. गेल्यावर्षी सिद्धार्थ आनंदने दत्तक घेतलेल्या मुलाची खरी आई परतली आहे. आणि तिने या मुलावर हक्क सांगितला आहे. सध्या सिद्धार्थ 'पठाण' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, त्याचदरम्यान त्याला या संकटाचा सामना करावा लागत आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये बोरीवली स्टेशनवर मानसिक रुग्ण असणारी महिला एका बालकाला दूध पाजताना मुंबई पोलिसांना सापडली होती. पोलिसांना मुलाच्या शरिरावर काही जखमाही आढळल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी मुलाच्या भविष्याचा विचार करता त्याला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केलं आणि मानसिक रुग्ण असणाऱ्या महिलेला कर्जतच्या श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडशेनमध्ये उपचारासाठी भरती केलं. याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे बाल कल्याण समितीने फॅमिली सर्व्हिस सेंटरच्या मदतीने त्या मुलाला अनाथ आश्रमात पाठवले. याठिकाणाहून सिद्धार्थ आनंदने त्याला दत्तक घेतलं होतं. बॉलिवूड हंगामाने याबाबत वृत्त दिलं आहे.

(हे वाचा-अंकिता लोखंडेची सुशांतला अनोखी श्रद्धांजली,VIDEO पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले)

सिद्धार्थ आनंदला आता या मुलाचा लळा लागला होता, पण तेवढ्यातच त्याची खरी आई ठीक होऊन परतली आहे. रिहॅबने फॅमिली सर्व्हिस सेंटरला ती महिला ठीक झाल्याचे प्रमाणपत्र देखील दिले आहे. बाल कल्याण समितीने त्या महिलेची आणि मुलाची डीएनए टेस्ट करण्यास सांगितले होते, हे काम देखील झाले आहे. ते बाळ या महिलेचच असल्याचं देखील सिद्ध झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पोलिसात पोहोचलं आहे.

(हे वाचा-Drug Case मध्ये बॉलिवूडमधून आणखी एकाला अटक, NCB ने जप्त केलं कोकेन)

बाल कल्याण समितीकडून सिद्धार्थला असं सांगण्यात आलं आहे की, ती महिला ठीक झाली आहे. तसंच तिला स्वत:च मुल परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. पोलिसांना देखील बाल कल्याण समितीने याविषयी योग्य पावलं उचलण्याचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या तो मुलगा सिद्धार्थबरोबरच राहत आहे. मात्र त्याची आई त्या मुलाच्या हक्कावर ठाम आहे. सिद्धार्थ आणि ममता भाटिया हे पती-पत्नी आहेत. दोघांना एक मुलगाही आहे.

First published:

Tags: Bollywood