बिल गेट्सनं केलं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चं कौतुक

बिल गेट्सनं केलं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चं कौतुक

अक्षय कुमारसाठी 2017 हे वर्ष एकदम राॅकिंग ठरलंय. 'रुस्तम'साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्सनं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा' सिनेमाची तारीफ केलीय.

  • Share this:

20 डिसेंबर : अक्षय कुमारसाठी 2017 हे वर्ष एकदम राॅकिंग ठरलंय. 'रुस्तम'साठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि आता जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्सनं अक्षयच्या 'टाॅयलेट एक प्रेमकथा'  सिनेमाची  तारीफ केलीय.

बिल गेट्स यांनी 2017मध्ये प्रभावित केलेल्या गोष्टींचा उल्लेख केलाय. त्यात त्यांनी 'टाॅयलेट एक प्रेमकथा'चा उल्लेख केलाय. त्यांनी म्हटलंय, ' टाॅयलेट एक प्रेमकथा बाॅलिवूडचा सिनेमा आहे. तो एका नवविवाहित जोडप्याची कथा सांगतो आणि त्यासोबत भारतातली शौचालयाची समस्या दर्शवतो.'

बिल गेट्सनं 'द एक्सप्रेस ट्रिब्युन' या मासिकातला आपला लेख ट्विट करत टाॅयलेटचा उल्लेख केलाय. यात सिनेमासंबंधीच माहिती आहे.

अक्षय कुमारचा 'टाॅयलेट एक प्रेमकथा' पंतप्रधानांच्या स्वच्छता अभियानाशी जोडलेला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. सिनेमानं 216 कोटींची कमाई केलीय.

First published: December 20, 2017, 5:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading