Home /News /entertainment /

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीवर टांगती तलवार, बिहार पोलीस करणार अटक?

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीवर टांगती तलवार, बिहार पोलीस करणार अटक?

गेल्या 24 तासात सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या मुंबई येथे सांताक्रृज याठिकाणी असणाऱ्या घरी बिहार पोलीस कधीही पोहोचू शकतात.

    मुंबई, 29 जुलै: गेल्या 24 तासात सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळत आहे. आताच एक नवीन अपडेट याप्रकरणी समोर येत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या मुंबई येथे सांताक्रृज याठिकाणी असणाऱ्या घरी बिहार पोलीस कधीही पोहोचू शकतात. एसएनडीटी विद्यापीठाजवळ असणाऱ्या तिच्या या घरी बिहार पोलीस कधीही पोहोचण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनाची तयारी देखील केली आहे. रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनाकरता मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करू शकते. यासंदर्भात तिने वकील सतीश मानशिंदे (Satish Manshinde) यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. सतीश मानशिंदे तेच वकील आहेत, ज्यांनी मुंबई बाँब हल्ल्याबाबत संजय दत्त तर त्यानंतर सलमान खान यांत्या केस लढल्या आहेत. (हे वाचा-'सुशांतला न भेटलेली माणसंही आज वाद घालत आहेत', सोनू सूदने साधला कंगनावर निशाणा!) सुशांतचे वडील कृष्णा सिंह यांनी पाटणा पोलीस ठाण्यात FIR दाखल केली आहे. त्यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (rhea chakraborty) आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सुशांतच्या बँक खात्यातून 17 कोटी गेल्या वर्षभरात काढले गेल्याचे म्हटले आहे. तर यातील 15 कोटी अशा खात्यात ट्रान्सफर झाले आहेत की ज्याच्याशी सुशांतचा काहीही संबध नाही, असा आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. (हे वाचा-वडिलांच्या FIR नंतर सुशांत प्रकरणाला मोठी कलाटणी; रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप) सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत सुशांतला आत्महत्या करण्यात काही फिल्मी लोकांचा हात होता, असं लिहिलं आहे. तक्रारीत कुणा एका व्यक्तीविरोधात आरोप नाही. पण सुशांतच्या गर्लफ्रेंडवर वेगळा आरोप करण्यात आला आहे. सुशांतला वेडं ठरवून त्याचे पैसे लुटायचा डाव रिया आणि तिच्या कुटुंबाचा होता असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी सांगितलं, "सुशांतला काही दिवसांतच भेटल्यानंतर रियाने त्याच्या आधीच्या घरात भूत असल्याचं सांगून त्याला घर बदलायला लावलं. त्यानंतर ज्या दुसऱ्या घरात सुशांत शिफ्ट झाला तिथं रिया आपल्या पूर्ण कुटुंबासह राहू लागली. रियाच्या कुटुंबाने त्याच्या घरातील नोकरही बदलले होते" (हे वाचा-"सुशांतने आत्महत्या केली यावर माझा विश्वास नाही", सुशांतच्या डॉक्टरांचा VIDEO) "रिया सुशांतचं मानसिक संतुलन खराब असल्याचं सांगू लागली. इतकंच नाही तर सुशांतला वेडं ठरवून त्याला मनोरुग्णालयात पाठवण्याची तयारीही रियाने केली होती. काही कारण नसताना डेंग्यू असल्याचं सांगून तिनं सुशांतला औषधं देणं सुरू केलं", असे काही गंभीर आरोप या एफआयरमधून करण्यात आले आहेत. रियाच्या वडिलांनी असे देखील आरोप केले आहेत की तिने त्याच्या घरातील नोकर बदलले होते. त्याच्या बहिणीला भेटण्यासाठी तो गेला असता, वारंवार त्याला फोन करून त्याच्यावर दबाव टाकून तिने परत बोलावले. तिला त्याला परिवारापासून दूर ठेवायचे होते. दरम्यान काल बिहार पोलीस मुंबईमध्ये दाखल झाले आहे. काही संभाव्य अटक करण्यासाठी 4 जणांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 35 हून अधिक जणांची चौकशी केली आहे. यामध्ये काही हाय प्रोफाइल व्यक्तींचा देखील समावेश आहे. दरम्यान पाटणा पोलीस याप्रकरणी स्वतंत्रपणे वेगळी चौकशी करतील, अशी माहिती समोर येत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या