सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पाटणा पोलिसांच्या चौकशीस सुरुवात- सूत्र

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पाटणा पोलिसांच्या चौकशीस सुरुवात- सूत्र

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी पाटणा पोलिसांनी मंगळवारपासून चौकशी करण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाला कालपासून एक वेगळे वळण मिळाले आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांवर सुशांतचे वडील केके सिंह (Mr. KK Singh) यांनी गंभीर आरोप केले आहे. त्यांनी पाटणा पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान याप्रकरणी पाटणा पोलिसांनी मंगळवारपासून चौकशी करण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. भादवी कलम 306 /341 / 342 /380 /406 /420 अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. पाटणा पोलिसांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. रियाच्या आणखी चौकशीची गरज पडल्यास ट्रान्झीट रिमांडसाठी पाटणा पोलीस मागणी करू शकतात. त्यामुळेच रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करू शकते. News18च्या सूत्रांकडून ही माहिती समोर येत आहे.

(हे वाचा-"सुशांतने आत्महत्या केली यावर माझा विश्वास नाही", सुशांतच्या डॉक्टरांचा VIDEO)

सुशांतच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटल्यानुसार तो त्याचा मित्र महेश शेट्टीबरोबर केरळमधील कुर्ग याठिकाणी शेती सुरू करणार होता. त्याची देखील पाटणा पोलिसांनी चौकशी केली आहे. सुशांतचे कुटुंबीय मुंबई पोलिसांच्या तपासाबाबत असमाधानी होते, परिणामी त्यांनी पाटणा पोलीस ठाण्यात काही गंभीर आरोप करत एफआयर दाखल केली आहे. त्यांनी एफआयआर कॉपीनुसार एकूण 7 मुद्द्यांकडे लक्ष वळवून एसआयटी द्वारा या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबापासून दूर केले, तिने त्याचा वापर पैशांसाठी केला असे काही गंभीर आरोप त्यांनी तिच्यावर केले आहेत. त्याचप्रमाणे सुशांतला वेडं ठरवून त्याचे पैसे लुटायचा डाव रिया आणि तिच्या कुटुंबाचा होता असा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे.

(हे वाचा-सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रियावर टांगती तलवार, बिहार पोलीस करणार अटक?)

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या मुंबई येथे सांताक्रृज याठिकाणी असणाऱ्या घरी बिहार पोलीस कधीही पोहोचू शकतात. एसएनडीटी विद्यापीठाजवळ असणाऱ्या तिच्या या घरी बिहार पोलीस कधीही पोहोचण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिया चक्रवर्तीने तिच्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनाची तयारी देखील केली आहे. रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिनाकरता मुंबई सत्र न्यायालय किंवा मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करू शकते. यासंदर्भात तिने वकील सतीश मानशिंदे (Satish Manshinde) यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. सतीश मानशिंदे तेच वकील आहेत, ज्यांनी मुंबई बाँब हल्ल्याबाबत संजय दत्त तर त्यानंतर सलमान खान यांत्या केस लढल्या आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 29, 2020, 9:12 AM IST

ताज्या बातम्या