मुंबई, 1 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत (sushant singh Rajput suicide case)आत्महत्या प्रकरणी तपास करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या बिहार पोलीस (Bihar police) आज आणखी एका चित्रपट दिग्दर्शकाच्या घरी पोहोचले. रिया (Rhea Chakraborty) आणि सुशांत यांच्याबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल या दिग्दर्शकाने यापूर्वीसुद्धा वक्तव्य केलं होतं. सुशांतच्या रॉम कॉम चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी (Rumi Jaffery) यांच्या मुंबईतच्या घरात बिहार पोलीसांनी चौकशीसाठी हजेरी लावली.
रुमी जाफरी यांनी काही दिवसांपूर्वी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी काही मोठे खुलासे केले होते. विशषतः रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांच्या नात्याविषयी रुमीने वक्तव्य केलं होतं. रुमी म्हणाले होते, "सुशांत आणि रिया एकमेकांबरोबर खूश होते. लवकरच त्या दोघांच्या एकत्रित चित्रपटाला सुरुवात होणार होती आणि मेमध्ये शूटिंगच्या तारखा होत्या. पण Coronavirus च्या भीतीने शूटिंग पुढे ढकललं होतं." आता रुमीकडे चौकशी करण्यासाठी बिहार पोलिसांची टीम पोहोचल्याचं वृत्त आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वासाठी मोठा धक्का होता. त्याचे कुटुंबीय तर कोलमडून गेले आहेत. दरम्यान या घटनेच्या तब्बल 40 दिवसांनतर सुशांतचे वडील केके सिंह (KK Singh) यांनी याप्रकरणी रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात एफआयआर दाखल केली. पाटणामध्ये ही एफआयआर दाखल केल्यामुळे आता पाटणा पोलीसही मुंबईत येऊन प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत. यामध्ये रोज नवीन घडामोडी समोर येत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर ही आत्महत्या असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले होते. मात्र आता पाटणा पोलीस एका वेगळ्या अँगलने याप्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान नुकतीच अशी माहिती समोर येत आहे की, सुशांतच्या मुंबईच्या वांद्रे येथील घराचे सीसीटीव्ही फुटेज पाटणा पोलीस ताब्यात घेणार आहे. सीसीटीव्ही फुटेजबाबत सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.