मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

वडिलांनी हत्येचा आरोप केल्यानंतर अभिनेत्याच्या आत्महत्या केसमध्ये नवं वळण! बिहारमधील FIRवर मुंबई पोलीस करणार चौकशी

वडिलांनी हत्येचा आरोप केल्यानंतर अभिनेत्याच्या आत्महत्या केसमध्ये नवं वळण! बिहारमधील FIRवर मुंबई पोलीस करणार चौकशी

अभिनेता अक्षत उत्कर्षच्या आत्महत्या प्रकरणाला त्याच्या कुटुंबीयांनी हत्येची तक्रार केल्यानंतर एक वेगळं वळण मिळालं होतं. दरम्यान याप्रकरणी दाखल करण्यात आलेली झिरो FIR मुंबईत ट्रान्सफर करण्यात आली आहे.

    मुंबई, 19 नोव्हेंबर: मनोरंजन विश्वात 2020 मध्ये काही धक्कादायक  घटना घडल्या आहेत, यापैकी नवोदित कलाकार अक्षत उत्कर्षची (Akshat Utkarsh Death Case) आत्महत्या ही देखील अत्यंत दु:खद घटना होती. याप्रकरणी आता एक महत्त्वाची अपडेट हाती येत आहे. अक्षतच्या मृत्यूनंतर अशी माहिती मिळाली होती की, अक्षत उत्कर्ष अंधेरीमधील त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडला. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या होती. टीव्ही कलाकार अक्षत उत्कर्षच्या आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे हे प्रकरण एका वेगळ्या वळणावर आले आहे. दरम्यान झिरो एफआयआर आता मुंबईच्या आंबोली पोलीस ठाण्यात ट्रान्सफर करण्यात आली आहे. आता मुंबई पोलीस (Mumbai Police) याप्रकरणी चौकशी करणार आहेत. अक्षत उत्कर्ष आत्महत्या प्रकरणात बिहार पोलिसात झिरो एफआयआर (Zero FIR) दाखल करण्यात आली होती. एफआयआरची कॉपी आता मुंबईतील आंबोली पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली आहे. मुंबई पोलिसात प्रकरण ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई पोलीस आता हत्येच्या अँगलने आता तपास सुरू करतील. (हे वाचा-सुशांत प्रकरणात फेक न्यूजचा सुळसुळाट! युट्यूबरने कमावले लाखो, FIR दाखल) अक्षतच्या कुटुंबीयांनी त्याची तथाकथित गर्लफ्रेंड आणि तिच्या बहिणीवर आरोप केला आहे. अंधेरीतील आंबोलीमध्ये अक्षतचा मृतदेह 27 सप्टेंबर 2020 रोजी सापडला होता.  त्यावेळी मुंबई पोलिसांनी योग्य सहकार्य न केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी बिहारच्या मुज्जफरपूरमध्ये झिरो एफआयआर नोंदवून खुनाची तक्रार केली होती. (हे वाचा-सलमानच्या घरी होणार होती लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी, पण कोरोनामुळे रंगाचा बेरंग) अभिनेत्याचे कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूमागे हत्येचा कट असल्याचा संशय व्यक्त केला होता. याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या मृत्यूच्या तीन तास आधी अक्षतचे त्याच्या वडिलांशी फोनवरून बोलणे झाले होते. मुजफ्फरपूरमधील सिकंदरपूरचा रहिवासी असून विजयंत चौधरी उर्फ राजू चौधरी यांचा तो मुलगा होता. तो टेलिव्हिजनबरोबरच भोजपुरी सिनेमात त्याचे नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात होता. लखनऊमधून त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो मुंबईत राहत होता आणि अंधेरी वेस्टमधील आरटीओ ऑनलाइन सुरेश नगर स्थित एका भाड्याच्या घरात तो राहत होता. याठिकाणी त्याच्याबरोबर स्ट्रगलर अभिनेत्री स्नेहा चौहान राहत असे. अक्षतचे काका विक्रम किशोर यांनी अशी माहिती दिली होती की, अक्षत आणि स्नेहामध्ये खूप जवळीक होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या