शर्मिष्ठा वाचली,नंदकिशोर बिग बॉस घरातून बाहेर !

शर्मिष्ठा वाचली,नंदकिशोर बिग बॉस घरातून बाहेर !

नंदकिशोर वाईल्डकार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला होता. पाच आठवडे नंदकिशोरने बिग बॉसच्या घर चांगलेच गाजवले.

  • Share this:

मुंबई, ८ जुलै : मराठी बिग बाॅसच्या घरात हुकुमशाही गाजवणारा नंदकिशोर चौघुले आज घराबाहेर पडलाय. या आठवड्यामध्ये शर्मिष्ठा आणि नंदकिशोर चौघुले डेंजर झोनमध्ये आले होते. पणया आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुलेला घराबाहेर जावं लागलं. नंदकिशोर वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला होता.

बिग बाॅसच्या घरात 'हुकुमशहा' नंदकिशोर असा का वागला ?

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर आठवड्याला नवनवीन ड्रामा पाहण्यास मिळतोय. मागील आठवड्यात पुष्कर, मेघा, सई यांच्या ग्रुपमध्ये चांगलाच राडा रंगला होता.  पुष्कर आणि सई यांनी मेघावर असलेली नाराजगी व्यक्त केली. पुष्कर, सई, रेशम, आस्ताद, नंदकिशोर हे सगळेच मेघा विरोधात आले. या विकेंडचा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना पत्र लिहिली. मेघाने शर्मिष्ठाला पत्र लिहिलं तर पुष्कर आणि सईने एकमेकांना. आस्ताद आणि स्मिताने रेशमला पत्र लिहिले तर नंदकिशोर यांनी मेघाला चांगलेच खरमरीत पत्र लिहिले. या पत्रामधून सदस्यांनी त्यांना वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या.

'हुकुमशहा' नंदकिशोरच्या विरोधात बंड, मेघाला होणार शिक्षा

या आठ सदस्यांमधून एक सदस्य आज घराबाहेर गेला. आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये फक्त सात सदस्य उरले आहेत.. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. या आठवड्यामध्ये शर्मिष्ठा आणि नंदकिशोर चौघुले डेंजर झोनमध्ये आला.

मेघानं नंदकिशोरच्या डोक्यावर का फोडलं अंड?

बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुले यांना घराबाहेर जावं लागलं. नंदकिशोर वाईल्डकार्ड एन्ट्रीद्वारे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आला होता. पाच आठवडे नंदकिशोरने बिग बॉसच्या घर चांगलेच गाजवले. त्याला देण्यात आलेला हुकुमशहाचा टाॅस्क चांगलाच गाजला होता. त्याच्या हुकुमशाहीमुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली होती.

'बिग बॉस म्हणजे वेड्यांचा बाजार'

First published: July 8, 2018, 10:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading