मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ब्रालेट घालून राजीवसोबत डीनरसाठी गेली बिग बॉस फेम नेहा भसीन; VIDEO समोर येताच झाली ट्रोल

ब्रालेट घालून राजीवसोबत डीनरसाठी गेली बिग बॉस फेम नेहा भसीन; VIDEO समोर येताच झाली ट्रोल

 'बिग बॉस 15'   (Bigg Boss 15)  शोमधून बाहेर पडल्यानंतर राजीव अदातिया   (Rajiv Adatia)  आपल्या मित्रांसोबत वेळ घालवत आहे. अलीकडेच तो शोमध्ये आलेल्या नेहा भसीनसोबत   (Neha Bhasin)   डिनरला जाताना दिसला.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 22 डिसेंबर-  'बिग बॉस 15'  (Bigg Boss 15)  शोमधून बाहेर पडल्यानंतर राजीव अदातिया   (Rajiv Adatia)  आपल्या मित्रांसोबत वेळ घालवत आहे. अलीकडेच तो शोमध्ये आलेल्या नेहा भसीनसोबत   (Neha Bhasin)   डिनरला जाताना दिसला. राजिवसोबत डिनरला जाताना नेहा खूपच ग्लॅमरस दिसत होती. नेहा आणि राजीव यांना एकत्र पाहून सेलिब्रिटी फोटोग्राफर्सनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच तो लगेचच व्हायरल झाला. नेहाने तिच्या इंस्टाग्रामवरही हे फोटो शेअर केले आहेत.मात्र आता ती या फोटो आणि व्हिडीओमुळे   (Troll On Viral Video)  प्रचंड ट्रोल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये 'बिग बॉस ओटीटी' आणि 'बिग बॉस 15'ची स्पर्धक राहिलेल्या नेहा भसीनचा हॉट आणि बोल्ड लूक पाहायला मिळाला. नेहा थोडेच दिवस घरात राहिली असली तरी ती बरीच लोकप्रिय झाली होती. बिग बॉसच्या घरात राहात असताना तिची राजीव अदातियासोबत चांगली मैत्री झाली होती. नुकताच राजीव बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. तेव्हा दोघेही एकत्र डिनर डेटला जाताना दिसले. या डिनर डेटला नेहाने पर्पल कलरचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला होता. कडाक्याच्या थंडीत नेहा तिच्या छोट्या आणि बोल्ड आउटफिटमुळे ट्रोल होऊ लागली.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. एकीकडे नेहाच्या चाहत्यांनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे काही युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलं आहे, 'उर्फी जावेदची मोठी बहिण आहेस का?'. उर्फी 'बिग बॉस ओटीटी'चा देखील भाग राहिली आहे आणि तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळं तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
आणखी एका युजरने लिहिलं की 'या लोकांना थंडी वाजत नाही का?' तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, 'त्यांच्या ड्रेसला काय झालं?' तर कोणी एकाने मजेशीर कमेंट करत लिहिलं, 'कोण आहेत हे लोक भाई .. एह राजू मेरा चष्मा तो ला रे बाबा'. बिग बॉस ओटीटी दरम्यान नेहा आणि प्रतीक सहजपाल यांच्या जवळीकतेची बरीच चर्चा झाली होती. त्याचवेळी बाहेर आल्यानंतर राजीवही त्याची बहीण शिल्पा शेट्टीला भेटायला गेला होता.
First published:

Tags: Bigg boss, Entertainment

पुढील बातम्या