Home /News /entertainment /

Tejsswi Prakash ने करण कुंद्राला दिलं खास व्हॅलेंटाईन गिफ्ट,अभिनेत्याने LIVE येत केला खुलासा

Tejsswi Prakash ने करण कुंद्राला दिलं खास व्हॅलेंटाईन गिफ्ट,अभिनेत्याने LIVE येत केला खुलासा

'बिग बॉस 15' ची विजेती (Bigg Boss 15 Winner) तेजस्वी प्रकाश (Tejsswi Prakash) सध्या सतत 'नागिन 6' (Nagin 6) च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, ती आणि करण कुंद्रा (Karan Kundra) एकमेकांसाठी वेळसुद्धा काढत आहेत.

  मुंबई, 15 फेब्रुवारी-  'बिग बॉस 15' ची विजेती   (Bigg Boss 15 Winner)   तेजस्वी प्रकाश (Tejsswi Prakash) सध्या सतत 'नागिन 6'  (Nagin 6)  च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, ती आणि करण कुंद्रा (Karan Kundra)  एकमेकांसाठी वेळसुद्धा काढत आहेत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून काल व्हॅलेंटाईन डे   (Valentine Day)  साजरा केला. व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी या जोडप्याने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत चाहत्यांशी संवाददेखील साधला. दोघांचे हे लाईव्ह सेशन खूपच मजेशीर होते. यादरम्यान करण कुंद्राने तेजस्वी प्रकाशची चांगलीच चेष्टा मस्करीदेखील केली. लाईव्हमध्ये करण कुंद्राने चाहत्यांना सांगितलं की, तेजस्वीने तिच्या 'नागिन 6' च्या बिझी शेड्युलनंतर स्वतः त्याच्यासाठी चिकन बिर्याणी बनवली होती. या लाईव्ह सेशनमध्ये चाहते करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांना वारंवार विचारत होते की दोघे लग्न कधी करणार. यादरम्यान करण कुंद्रानेही तेजस्वी प्रकाशबद्दल तिच्या चाहत्यांकडे तक्रार केली. तो म्हणाला, 'बघा मित्रांनो... मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मॅडमसाठी एक सुंदर पोस्ट शेअर केली होती आणि हिला त्याचं महत्वचं नाहीय.. दरम्यान रोहित सुचांती या दोघांच्या इंस्टाग्रामच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.' त्याचवेळी तेजस्वी प्रकाश करण कुंद्राला मध्येच थांबवत म्हणाली, 'तो कालचा व्हिडिओ आहे... मी आजही पोस्ट शेअर केली आहे.' करण कुंद्राने सांगितलं की मी माझ्या घरी तेजस्वीसाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं परंतु तिने इतक्या लांबून इतक्या ट्रॅफिकमधून मला इकडे बोलावून घेतलं. दरम्यान करण कुंद्रा तेजस्वीचं कौतुकही करत होता आणि तिची मस्करीही करत होता. करण कुंद्राने चाहत्यांना सांगितलं की, 'नागिन 6' चं बिझी शेड्युल संपताच तेजस्वी प्रकाश घरी आली आणि आई-वडिलांच्या मदतीने माझ्यासाठी चविष्ट बिर्याणी बनवली. यावेळी करण कुंद्रा कौतुक करत म्हणाला की, बिर्याणी अप्रतिम होती. करण कुंद्रानेही अनेकवेळा सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. याआधीही दोघं एकत्र लाइव्ह आले आहेत, आणि एकमेकांचे व्हिडिओही शेअर केले आहेत. अलीकडेच करण कुंद्राही 'नागिन 6' च्या सेटवर तेजस्वी प्रकाशला भेटायला गेला होता. त्यानंतर करण कुंद्रा शोचा मुख्य अभिनेता आणि बिग बॉस 15 चा सह-स्पर्धक सिंबा नागपाललासुद्धा भेटला होता.
  View this post on Instagram

  A post shared by Karan Kundrra (@kkundrra)

  दरम्यान तेजस्वीने त्या दोघांची भेट रेकॉर्ड करत आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअरही केली होती. यामध्ये करण कुंद्रा आणि सिम्बा नागपाल एकमेकांशी गप्पा मारताना दिसले होते. करण कुंद्रा आणि सिम्बा नागपाल दोघेही थट्टा-मस्करी करताना दिसत होते. यावेळी, सिम्बा नागपालदेखील करणला सावधगिरी बाळगण्यास सांगतो कारण तो मालिकेत त्याची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाशसोबत रोमान्स करणार असल्याचं सांगतो.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bigg boss, Entertainment, Tv actress

  पुढील बातम्या