Home /News /entertainment /

बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडणार, कोण नॉमिनेट तर कोण होणार सेफ ?

बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडणार, कोण नॉमिनेट तर कोण होणार सेफ ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे नॉमिनेशन कार्य ! या कार्यात कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार ? आणि कोण होणार सेफ हे आज कळेलच.

    मुंबई, 6 डिसेंबर : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे नॉमिनेशन कार्य ! या कार्यात कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार ? आणि कोण होणार सेफ हे आज कळेलच. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहिर केले, बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडले जाईल. आता पार पडणार आहे  घराबाहेर होण्याची प्रक्रिया...” यानंतर नवे आलेले सदस्य नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे सांगताना आणि त्यांच्या नावाच्या बाहुल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर टाकताना दिसत आहेत. बघूया आता कोण वाचणार आणि कोण नॉमिनेट होणार ? बिग बॉस मराठीच्या घरात (Bigg Boss Marathi 3 ) काल मीरा आऊट झाल्याचे सांगून तिची फसवणूक केली. जर ती काल आऊट झाली असती तर आतापर्यतच या घरातील सर्वात मोठ एलिमेशन ठरल असतं. मात्र महेश मांजरेकर यांनी सांगून ठाकले की वोटींग (bigg boss marathi no elimination ) लाईन बंद असल्याने मीरा घरातून जाणार नाही. यानंतर घरात आनंद आणि आनंद पाहिला मिळाला.बिग बॉसच्या घरात हा आनंद जास्त काळ टिकणार नाही. कारण पुढील आठवड्यात दोन एलिमेशन होणार असल्याचे महेश मांजरेकर यांनी सांगितलं आहे. यासोबतच घरातील सदस्यांच्या आनंदात विरजण टाकण्यासाठी आता घरातील काही जुने सदस्य देखील घरात आले आहेत. वाचा :  'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत आणखी एक ट्विस्ट; मालिका घेणार लीप, पाहा VIDEO बिग बॉस मराठी सीझन 3 चे जुने स्पर्धक आज पुन्हा चावडीवर दिसणार आहेत. यावेळी स्नेहाने जय दुधाणेला सुनावलं आहे तर तृप्ती देसाईंनी विशालचं कौतुक केलं आहे. घरामध्ये पोहोचताच या माजी स्पर्धकांनी सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे सांगितले. हे तीन जुने प्रतिस्पर्धी पुन्हा BBM3 च्या घरात आल्यावर स्पर्धकांनाही मोठा आनंद झाला आहे.यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की, 'विशाल एकदम मस्त... मागच्या आठवड्यात जो ट्रॅक चेंज केला ना, वन मॅन आर्मी. जे मी पहिल्यापासून सांगत होते कुठेतरी चेंज झाला पाहिजे आणि तुम्हांला सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही! लंबी रेस का घोडा है! मस्त एकदम. मी सगळ्यांना सांगितलं की, सगळ्यात छान मनं आमच्या विशालचं आहे, की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं कधी नसतं...”तृप्ती देसाई मीराला म्हणाल्या तू फटक्यांमध्ये लक्ष्मी बॉम्ब आहेसतर मीनलला असं म्हणाल्या की तुम्ही या खेळात सुतळी बॉम्ब आहात. वाचा : Bigg Boss च्या घरात विकास आणि सोनालीमध्ये यावरून झाले मतभेद, पाहा video 'बिग बॉस मराठी' या शो ने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आता या शो चे केवळ 3 आठवडे शिल्लक आहेत. अर्थातच ग्रँड फिनाले जवळ येत आहे. त्यामुळे सर्वजण आपलं स्थान पक्क कण्यासाठी धडपड करत आहे. आणि यातूनच घरातील स्पर्धकांच्या मैत्रीमध्ये फूट पडताना दिसून येत आहे.
    जाणून घेण्यासाठी बघा राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    पुढील बातम्या